घरात बॉम्ब बनवत होता मोहम्मद; स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू तर ३ गंभीर जखमी

13 Apr 2024 13:06:22
 Bomb Blast
 
पाटणा : बिहारच्या बांका येथे बॉम्बस्फोट झाल्याची बातमी आहे. हे प्रकरण धोरैया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. बॉम्बस्फोटामुळे चार निष्पाप मुलेही गंभीर जखमी झाली आहेत. या सर्वांना गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता चौघांना भागलपूरच्या मायागंज रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे आणि भयाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. त्या घरातच बॉम्ब बनवला जात असल्याचे सांगण्यात आले.
 
घराभोवती चार जण खेळत होते. यादरम्यान अचानक बॉम्बचा स्फोट झाला आणि चौघेही गंभीर जखमी झाले. बॉम्बस्फोटाचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना शुक्रवार, दि. १२ एप्रिल २०२४ रात्री उशिरा अहिरो नावाच्या गावात घडली. घरासमोर, मोहम्मद इस्माईल अन्सारी यांचा ८ वर्षांचा मुलगा कुर्बानचा मृत्य झाला.११ वर्षांचा मुस्तफा आणि मोहम्मद सद्दामचा ३ वर्षांचा मुलगा सनल्लाह, मोहम्मद असी शहनाई यांचा ७ वर्षाचा मुलगा अबू अलिफा, हे सर्व खेळत होते.
 
हे वाचलंत का? -  कट्टरपंथीयांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकी; घरावर लावले 'सर तन से जुदा'चे पोस्टर
 
स्फोट झाल्यानंतर सर्वच मुले गंभीर जखमी होऊन तिथेच पडलीय गावकऱ्यांच्या मदतीने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला धोरैयाच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तेथे सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांना दुसरीकडे नेण्यात आले. दोन मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी मुलांच्या आईने सांगितले की, मुले खेळत असताना अचानक कोणीतरी बॉम्ब फेकला.
 
तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. मुलांच्या आईने कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ज्या व्यक्तीच्या घरात बॉम्बस्फोट झाला त्याचे नाव मोहम्मद इस्रायल असल्याचे सांगण्यात येत आहे. ताज्या बातमीत जखमींपैकी एका मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. बॉम्ब बनवत असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. एसपी डॉ सत्यप्रकाश यांनी सांगितले की, बॉम्ब बनवण्याचे साहित्यही सापडले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0