साधा माणूस ते कलासक्त रसिक घडवणारी 'अभिरुची जोपासना कार्यशाळा'

12 Apr 2024 19:06:15

Abhiruchi Jopasna Karyashala

मुंबई (प्रतिनिधी) :
विविध कलांची जवळून ओळख करून घेण्यासाठी आणि आपले जगणे अधिक समृद्ध करण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने (Rambhau Mhalgi Prabodhini) तीन दिवसीय (१०, ११, १२ मे) 'अभिरूची जोपासना कार्यशाळा' आयोजित केली आहे. ही कार्यशाळा शुक्रवार, दि. १० मे रोजी सायं. ५ वा. ते रविवार, दि. १२ मे रोजी सायं. ५ वा. पर्यंत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशवसृष्टी, उत्तन, भाईंदर येथे होणार आहे.

हे वाचलंत का? : 'त्या' सफाई कर्मचाऱ्यांच्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी

कलांची आवड असणारे कोणीही या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात. कार्यशाळेचे नोंदणी शुल्क रु. ३००० (जी.एस.टी सहीत) असून नोंदणीची अंतिम तारीख ४ मे. आहे. निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्यासह सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. साधा माणूस ते कलासक्त रसिक हा चैतन्यमय प्रवास अनुभवण्यासाठी अवश्य सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क - विनय मावळणकर ९०९६५४८२५०, अनिल पांचाळ ९९७५४१५९२२, साक्षी मोरे ९९६७८४४१८४

कार्यशाळेत येणारे मार्गदर्शक व त्यांचे विषय 
१) मैत्री पुस्तकांशी : अभिराम भडकमकर, सुप्रसिद्ध नाटककार आणि कादंबरीकार
२) नाटक समजून घेताना... : वामन केंद्रे, रंगभूमीचे उपासक आणि ज्येष्ठ दिग्दर्शक व नाट्यप्रशिक्षक
३) शास्त्रीय संगीताचा 'कान तयार' करणे : केशव परांजपे, गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांचा सहवास लाभलेले, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक आणि जाणकार
४) चित्रपट संगीत - अनुभव आणि आनंद : डॉ. मृदुला दाढे, गायिका, लेखिका आणि हिंदी चित्रपट संगीताच्या दर्दी अभ्यासक
५) शिल्पकला - निर्जिवातील जिवंतपणा : प्रमोद कांबळे, सुप्रसिद्ध व प्रयोगशील शिल्पकार
६) रसिक नजरेतून चित्रकला : विजयराज बोधनकर, प्रतिभावान लेखक व चित्रकार
७) चित्रपट पाहण्याची 'दृष्टी' : मिलिंद लेले, चित्रपट दिग्दर्शक आणि रसिक सिनेअभ्यासक


Powered By Sangraha 9.0