तीन बायका मौलानाची फजिती ऐका! पती गायब अन् बिंग फुटलं

12 Apr 2024 11:38:15
 Maulana
 
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एक हास्यास्पद घटना समोर आली आहे. येथे बेपत्ता मौलानाच्या तपास करत असताना पोलिसांना मौलाना त्याच्या तिसऱ्या बायकोसोबत सापडला. मौलाना बेपत्ता झाल्याची एफआयआर त्याच्या दोन पत्नींनी दाखल केली होती. मौलानाला तीन बायका असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मौलानाला गोंडा येथून सुखरूप शोधून काढले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या सआदतगंजमध्ये राहणाऱ्या एका महिलेने दि. १९ फेब्रुवारी रोजी पती मौलाना मंजर अली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. महिलेने सांगितले की, तिचा नवरा दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी अचानक घरातून गायब झाला आणि तो परत आलाच नाही. त्याचा मागमूसही नाही.
 
हे वाचलंत का? -  'निष्क्रिये तुझे नाव अनंत गीते'; सुनिल तटकरे यांचा हल्लाबोल
 
यानंतर पोलिसांनी मौलानाचा शोध सुरू केला. दरम्यान, आणखी एका महिलेनेही पोलिस ठाणे गाठून मौलाना बेपत्ता असल्याची तक्राद दाखल केली. तिचा पती मौलाना मंजर अली हा अनेक दिवसांपासून बेपत्ता असून त्याचा शोध लागत नसल्याचा दावाही महिलेने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही घटनांमधील साम्य तपासले.
 
दोन्ही महिला ज्या मंजर अलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार करत होत्या, तो पुरुष एकच असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्याने दोनदा लग्न केले आहे आणि त्याच्या दोन्ही पत्नींना याची माहिती नाही. त्यानंतर पोलिसांनी मौलानाचा फोन आणि इतर माहिती घेऊन त्याचा शोध सुरू केला.
 
 हे वाचलंत का? - मालेगांवात नमाज सुरू असताना तरुणाने फडकवला पॅलेस्टाईनचा ध्वज
 
पोलिसांच्या शोधात या संपूर्ण कथेला आणखी एक वळण मिळाले. मौलाना मंजर अलीला उत्तर प्रदेशातील गोंडा येथून पोलिसांनी शोधून काढले, मात्र यामध्ये आणखी एक खुलासा झाला आहे. मौलाना मंजर अलीचा पोलिसांनी गोंडा येथून शोध घेतला तेव्हा तो त्याच्या तिसऱ्या बायकोसोबत तिथे राहत होता.
 
मौलानाने तीन वेळा लग्न केल्याचे आणि त्यांच्या तीन पत्नींना याबाबत काहीही माहिती नसल्याचे समोर आले. मौलानाने सांगितले की, तो लखनऊहून आपल्या दोन बायकांवर नाराज होता, त्यामुळेच गोंडा येथे तिसऱ्या बायकोपाशी आला होता. मौलाना मंजर अलीला पोलिसांनी नुकतेच त्यांच्या पत्नींच्या ताब्यात दिले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0