विदेशी मुद्रेत ऐतिहासिक वाढ! तब्बल….

12 Apr 2024 18:22:43

Foreign Reserves
 
 
मुंबई: भारतीय विदेशी मुद्रेत ऐतिहासिक वाढ झाली आहे. भारताच्या विदेशी मुद्रेत (Foreign Exchange Reserve) मध्ये वाढ होत ६४८.४६ डॉलर्सपर्यंत वाढ झाली आहे. भारताच्या विदेशी मुद्रेत एकूण २.९८ दशलक्ष डॉलर्सने वाढ झाली आहे.
 
मार्च २९ पर्यंत भारताच्या विदेशी मुद्रेत २.९५ अब्ज डॉलर्सने वाढ होत विदेशी मुद्रेत ६४५.६ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ झाली होती. आरबीआयने नुकतेच आठवड्याच्या अहवालात म्हणजेच विकली स्टॅटिस्टिकल सपलिमेंट (WSS) म्हटल्याप्रमाणे, विदेशी मुद्रेत मागील आठवड्यातील ५४९ दशलक्ष डॉलर्स तुलनेत या आठवड्यात ५७१.१७ अब्ज डॉलर पर्यंत वाढ झाली आहे. या मुद्रा डॉलरमध्ये मूल्यांकित केल्या असल्या तरी रुपया व डॉलरची पडझड व वधारलेली किंमत व त्यांचे दैनंदिन परिणामांचे मोजमाप करून ही आकडेवारी ठरवली जाते.
 
याशिवाय सोन्याच्या साठ्यात २.४ अब्ज डॉलरवरून ५४.५६ अब्ज डॉलर पर्यंत वाढ झाली आहे.एसडीआर (Special Drawing Rights) मध्ये २४ दशलक्षाने वाढ होत १८.१७ अब्ज डॉलर पर्यंत किंमत पोहोचली आहे.
 
बाजारातील चलनाच्या साठ्यात कमी व जास्ती पुरवठा पाहत आरबीआय साठ्यात खरेदी विक्री करत बाजार चलनाची तरलता (Liquidty) नियंत्रित करते.याशिवाय अर्थव्यवस्थेतील स्थिती पाहता विदेशी मुद्रेचा किती साठा असावा याबाबत धोरण ठरवते.
 
Powered By Sangraha 9.0