मुंबई (प्रतिनिधी) : मीरा रोड येथील मिनाक्षी नगर परिसरात गोहत्येचा (Gohatya Mira Road) प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. इस्लामिक सण असलेल्या ईदपूर्वी संबंधित प्रकार घडला असून मिळालेल्या वृत्तानुसार काशीगाव पोलिसांनी नईम सैफ कुरेशी नामक आरोपीला ताब्यात घेतले आहे. अन्य दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा तपास सध्या सुरु आहे.
संबंधित घटना मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी रात्री उशिरा मिनाक्षी नगर परिसरात घडली. काशीगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदारांना यासंबंधी सतर्क करण्यात आले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचताच कुरेशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर दोघांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोठे चाकूसारखे शस्त्र, एक दोरी आणि गुरांची कातडी जप्त केली आहे.