बाबा अमरनाथची यात्रा २९ जूनपासून होणार सुरू!

१५ एप्रिलपासून नोंदणी करता येणार

    12-Apr-2024
Total Views |

Baba Amarnath Yatra

मुंबई (प्रतिनिधी) :
बाबा अमरनाथ यात्रेचे (Baba Amarnath Yatra) वेळापत्रक जाहीर झाले असून यात्रा २९ जूनपासून सुरू होणार आहे. १९ ऑगस्टला रक्षाबंधनापर्यंत यात्रा चालेल. यावेळी यात्रेचा एकूण कालावधी ५२ दिवसांचा असेल. यात्रेसाठीची ऑनलाइन/ऑफलाइन नोंदणीची प्रक्रिया १५ एप्रिलपासून सुरू होईल. प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

हे वाचलंत का? : 'LoC'जवळ ७५ वर्षांनी झाली 'गंगा आरती'

श्री अमरनाथ श्राइन बोर्ड लवकरच नोंदणीसाठी अधिकृत बँकांच्या शाखांबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करेल. नोंदणीसाठी आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे, त्यामुळे देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्णालये आणि आरोग्य प्रमाणपत्रे बनविणाऱ्या डॉक्टरांच्या पथकांची यादीही प्रसिद्ध केली जाईल. याशिवाय गट नोंदणीसाठी मार्गदर्शक तत्त्वेही लवकरच जारी करण्यात येणार आहेत. या वर्षी देखील बाबा अमरनाथच्या पवित्र गुहेतील आरतीचे थेट प्रक्षेपण जुलै महिन्यात होणार आहे.

गेल्या वर्षी १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बाबा अमरनाथची वार्षिक यात्रा चालली होती. शिवभक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती.