‘श्रीरामा'साठी रणबीर कपूर रात्रंदिवस करतोय मेहनत; व्हिडिओ आला समोर

11 Apr 2024 18:06:46

ramayan  
 
 
मुंबई: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची सगळेजण आतुरतेने वाट पाहात आहेत. चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकी जबाबदारीची भूमिका निभावण्यासाठी रणबीर प्रचंड मेहनत करतान दिसत आहे. तसेच, या चित्रपटात रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, 'रामायण' चित्रपटासाठी रणबीर कपूरचा धर्नुविद्या प्रशिक्षकासोबतचा एक फोटो समोर आला होता. आता त्याचा भूमिकेला शोभणारी शरीरयष्ठी बनवतानाचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.
 
दरम्यान, दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी 'रामायण' चित्रपटासाठी भव्य सेट तयार केला असून मिळालेल्या माहितीनुसार, 'रामायण'च्या सेटसाठी तब्बल ११ कोटींचा खर्च केल्याचे समोर येत आहे.
 
 

ramayan  
 
काहीदिवसांपुर्वी सेटवरील फोटो, व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे 'रामायण' चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकांनी नो फोन पॉलिसी लागू केली आहे. तसेच शूटिंग संपेपर्यंत सेटवरील अतिरिक्त कर्मचारी आणि क्रू यांना सेटबाहेर जाता येणार नसल्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0