शाहरुख खान दिसणार रजनीकांत यांच्या सोबत, अजूनही बरेच सुपरस्टार असणार ‘थलायवर १७१’ चा भाग
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) त्यांच्या आगामी थलायवर १७१ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज करणार आहेत. मुळातच एक मोठा सुपरस्टार या चित्रपटात असताना यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेता शाहरुख खान देखील दिसणार आहे. याशिवाय विजय सेतुपति देखील विशेष भूमिकेत दिसणार अशी माहिती मिळत आहे. ‘थलावर १७१’ (Rajinikanth) या चित्रपटाचा टीझर लवकरच प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना खास सरप्राईज मिळणार असं दिग्दर्शकांनी म्हटले आहे.
रजनीकांत आणि लोकेश कनगराज यांचा 'थलायवर १७१' चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण होत आले असून चित्रपटाच्या नावात बदल होण्याचे संकेत येत आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्ताने रजनीकांत आणि लोकेश दोघंही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
तसेच, तब्बल ३३ वर्षांनी रजनीकांत आणि अमिताभ बच्चन थलायवर १७१ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. अमिताभ आणि रजनीकांत यांनी यापुर्वी ‘हम तुम’, ‘गिरफ्तार’ आणि ‘अंधा कानून’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.