मालेगांवात नमाज सुरू असताना तरुणाने फडकवला पॅलेस्टाईनचा ध्वज
11 Apr 2024 18:16:10
नाशिक : रमजान ईद निमित्ताने नाशिकच्या मालेगावमध्ये ( Palestine Flag Malegaon ) गुरुवारी, दि. ११ एप्रिल रोजी कॉलेज ग्राऊंडवर सामुदायिक नमाज पठण सुरू असताना एका मुस्लिम तरुणाने पॅलेस्टीनचा ध्वज फडकवत समर्थन केलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रमजान ईदच्या नमाज दरम्यान, आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद हे पॅलेस्टीनवर होत असल्याच्या अन्यायाबाबत संबोधित करत असताना एक तरुण पाठीमागून पॅलेस्टीन ध्वज घेऊन फडकवत आला आणि पॅलेस्टीनचा समर्थन केलं.
दरम्यान, मौलाना मुक्ती मोहम्मद यांनी त्या तरुणासोबत आपला काहीही संबंध नसल्याचा यावेळी खुलासा केला आहे. मात्र रमजान ईदच्यावेळी पॅलेस्टीनवर होत असलेल्या अन्यायाबाबत मौलाना मुक्ती मोहम्मद संबोधित करत असताना तरुणाने केलेल्या या कृत्यामुळे नागरिकांना उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, मालेगाव पोलीस स्थानकात सकल हिंदू समाज बांधवानी संबंधित तरुणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. परंतु पोलिसांनी आचारसंहिता भंग केल्या अंतर्गत गुन्हा दाखल होईल असे सांगिले. गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु आहे.