टेस्लाचे मुख्य एलोन मस्क मोदींना भेटायला भारतात येणार

10 Apr 2024 18:04:09

Elon Musk
 
मुंबई: आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या हालचाली होत आहेत. सरकार भारतात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत असताना आता नवीन माहिती वृत्तसंस्थेनी दिली आहे. नव्या माहितीनुसार टेस्ला कंपनीचे मुख्य एलोन मस्क (Elon Musk) या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. या भेटीदरम्यान गुंतवणूकविषयक चर्चा होऊ शकते.
 
टेस्लाला भारतात नवा प्रकल्प सुरू करायचा असल्याने एप्रिल २२ ला मस्क पीएम मोदींना भेटण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. भारतात गुंतवणूकीविषयी चर्चा होतानाच याबद्दल अधिकची माहिती समोर येऊ शकली नाही.एलोन मस्क यांच्यासह त्यांचे सहकारी देखील भारतात उपस्थित राहणार आहेत. या वेळापत्रकात बदलही होऊ शकतो. परंतु मस्क भारतात येणार आहे हे मात्र सुनिश्चित आहे. यावर्षी टेस्लाचे उत्पादन भारतात सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
 
चीनमध्ये वाढलेले ईव्ही कारचे उत्पादन व युएसमधील इलेक्ट्रिक व्हेईकलमधील कमी झालेली मागणी या कारणांमुळे टेस्ला भारतात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहे. गेल्या काही दिवसांपासून टेस्ला कंपनी भारतात येणार ही चर्चा सुरू होती. आपल्या राज्यात टेस्ला प्रकल्प यावा यासाठी दोन तीन राज्ये प्रयत्न करत आहे. टेस्ला भारतात आल्यास मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊन रोजगाराच्या संधी भारतात वाढू शकतात असा कयास आहे.
 
भारतातील ईव्ही (Electric Vehicles) लहान असले तरी भविष्यात मोठी मागणी भारतात वाढण्याची चिन्हे असताना टेस्ला प्रकल्प भारतात आल्यास मागणी आणखी वाढू शकते.
 
Powered By Sangraha 9.0