दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणारा ‘श्रीकांत’चा ट्रेलर प्रदर्शित

10 Apr 2024 11:37:09
राजकुमार रावचा अभिनयातील पॉवरपॅक धमाका पुन्हा एकदा 'श्रीकांत' चित्रपटात दिसणार
 
rajkumar  
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलु अभिनेता म्हणजे राजकुमार राव. आजपर्यंत प्रत्येक भूमिकेतून आपले वेगळेपण साध्य करणारा राजकुमार राव (Rajkumar Rao) आता नव्या भूमिकेत दिसणार असून यावेळी तो एका अंध व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीकांत’ हा चित्रपट लवकरच प्रदर्सित होणार असून नुकताच या (Rajkumar Rao) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
 
जन्मत: अंधत्व असलेले श्रीकांत मोठी स्वप्न पाहण्यास कोणताही विचार करत नव्हते. सामान्य मुलांच्या तुलनेने श्रीकांत हुशार आणि हजरजबाबी असल्यामुळे देशाचे माजी पंतप्रधान डॉ. ए.पी.जे अब्दूल कलाम यांनी थेट त्यांची दखल घेतली होती. श्रीकांत या चित्रपटात अंध व्यक्तींच्या मार्गात येणाऱ्या विविध अडचणी मांडण्यात आल्या आहेत. हे सर्व अडथळे दुर करत अंध व्यक्तींबाबत असलेला दृष्टीकोन श्रीकांत कसे दूर करतात, त्यांना या प्रवास कोणाची साथ मिळते, स्वप्न पूर्ण करताना कशी मेहनत घेतात अशा सगळ्या गोष्टी चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
 
इतकेच नव्हे, तर श्रीकांत यांना अंध असल्यामुळे विज्ञान शाखेत प्रवेश देण्यास नकार दिला होता. पण भारतीय शिक्षण व्यवस्थेत दृष्टिहीन मुलांना विज्ञानाचा पर्याय नसल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारला जातो. यानंतर ते भारतीय शिक्षण व्यवस्थेविरुद्ध खटला दाखल करण्याचा निर्णय घेतात याबद्दल दाखवण्यात आले आहे. श्रीकांत ज्यांना भारतात मनासारखे शिक्षण मिळण्यास अडचणी आल्या पण त्यांना MIT या जगातील अव्वल महाविद्यालयाने स्कॉलरशिप देऊन शिकण्यासाठी बोलावले. अशा असमान्य माणसाचा प्रवास प्रेक्षकांना श्रीकांत चित्रपटात पाहता येणार आहे.
 
श्रीकांत चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता राजकुमार राव असून त्यांना शरद केळकर, ज्योतिका यांनी देखील साथ दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले असून टी-सीरिजचे भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी यांनी निर्मिती केली आहे. 'श्रीकांत' चित्रपट १० मे रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0