गुंतवणूकदारांनो सावधान! एनएसई सीईओंचा डीप फेक व्हिडिओ व्हायरल!

10 Apr 2024 13:02:25
 
Ashish Chauhan
 
 
मुंबई: एनएसई मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक आशिषकुमार चौहान यांचे सोशल मीडियावरील व्हिडिओ
'डीपफेक' असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर फिरणारे व्हिडिओत आशिष कुमार चौहान यांच्या चेहऱ्याचा वापर करत हुबेहूब हातवारे करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता.
 
एनएसईकडून यासंदर्भात अधिकृत माहितीपत्रक काढत हा संबंधित व्हिडिओ 'डीपफेक' असल्याचे सांगितले आहे. याशिवाय गुंतवणूकदारांना सावधान राहण्याचा सल्ला यावेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंजने आपल्या परिपत्रकात दिलेला आहे.या व्हिडीओत आशिष कुमार यांच्या हुबेहूब आवाज तयार करत विशिष्ट समभाग विकण्याचे आवाहन या व्हिडिओतून करण्यात आले आहे. याची दखल घेत एनएससीने या व्हिडिओतील लोगोदेखील खोटा असल्याचे सांगितले आहे.
 
असे व्हिडिओ NSE चे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांच्या आवाजाचे आणि चेहऱ्यावरील हावभावांचे अनुकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ बनवलेले दिसते.
 
गुंतवणूकदारांना याद्वारे सावध केले जाते की अशा ऑडिओ आणि व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका आणि अशा बनावट व्हिडिओ किंवा इतर माध्यमांमधून येणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकीचे किंवा इतर सल्ल्याचे पालन करू नका,"असे एनएसईने यावेळी सांगितले ‌.
 
याशिवाय एनएसईने केवळ अधिकृत माहितीकरता त्यांच्या संकेतस्थळावरील माहितीला प्रमाण मानावे असे गुंतवणूकदारांना आवाहन केले आहे.संबंधित व्यासपीठावरून हे व्हिडिओ काढून टाकायची शिफारस या व्यासपीठांना देण्यात आली आहे. खरी माहिती व अधिकृत माहिती एक्सचेंजमधील अधिकृत सोशल मीडिया खात्यावर मिळणार आहे.‌
 
 
NSE च्या प्रक्रियेनुसार, कोणतेही अधिकृत संप्रेषण फक्त त्याच्या अधिकृत www.nseindia.com या वेबसाइटद्वारे केले जाते. एक्सचेंजचे सोशल मीडिया हँडल - Twitter: @NSEIndia, फेसबुक: @NSE भारत, Instagram: @nseindia, LinkedIn:@NSE भारत, YouTube: एनएसई इंडिया यावर माहिती दिली जाते. एनएसईच्या वतीने पाठवलेल्या संप्रेषणाचा आणि सामग्रीचा स्त्रोत सत्यापित करा आणि अधिकृत सोशल मीडिया हँडल तपासा. सर्व गुंतवणूकदारांनी याची नोंद घ्यावी आणि NSE किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडून आलेल्या माहितीची त्यांच्या वेबसाइटवरून पडताळणी करावी. त्यासाठी www.nseindia.com येथून अधिकृत माहिती मिळवू शकता. गुंतवणूकदारांनी आणि मोठ्या प्रमाणावर जनतेने वरील बाबी लक्षात घेण्याचा सल्ला दिला जातो.
 
 
Powered By Sangraha 9.0