"प्रेम म्हणजे प्रेम असतं, यांचं आणि त्यांचं सेम नसतं!"

10 Apr 2024 12:29:21
 
Uddhav Thackeray & Raj Thackeray
 
मुंबई : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं यांचं आणि त्यांचं सेम नसतं, असे म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. यांचं प्रेम बिनशर्त असतं आणि त्यांचं मुख्यमंत्री पद मागतं, असेही त्यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधला.
 
 
 
आशिष शेलार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं यांचं आणि त्यांचं सेम नसतं. यांचं बिनशर्त असतं आणि त्यांचं मुख्यमंत्री पद मागतं. त्यासाठी देव, देश आणि धर्मावर पाणी ही सोडत," असे म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
 
हे वाचलंत का? -  पवार गटाची तिसरी यादी जाहीर! रावेरमध्ये कोण लढणार?
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी गुढीपाडवा मेळाव्यात महायूतीला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी आपण महायूतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे सांगितले. दरम्यान, आता यावरुन आशिष शेलारांनी एक कविता शेअर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0