“सावरकरांबंदद्ल बोलण्यासाठीचा कलेजा बाबूजी आणि रणदीपकडे”, सुनील बर्वेंची खास पोस्ट

    01-Apr-2024
Total Views |
अभिनेते सुनील बर्वे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या बाबूजींच्या जीवनावरील चरित्रपटात ज्येष्ठ गीतकार सुधीर फडके यांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत.
 

sunil barve 
 
मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे निस्सिम देशभक्त क्रांतिकारक वीर सावरकर यांची जीवनगाथा रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चरित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे. बऱ्याच मराठी कलाकारांनी सोशल मिडियावरुन पोस्ट करत अधिकाधिक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक करत "वो कायर क्या जाने उन आसूओंकी कीमत जो वतन के लिए छलकते है!”, अशी पोस्ट त्यांनी (Sunil Barve) केली आहे.
 
सुनील बर्वे यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिले आहे की, "वो कायर क्या जाने उन आसूओंकी कीमत जो वतन के लिए छलकते है!! अभिनंदन रणदीप हुडा, ह्या थोर स्वातंतत्र्यवीराचं चरित्र चित्रपटाच्या माध्यमामातून जगासमोर आणल्याबद्दल!! सावरकरांबद्दल इतक्या समर्पित भावनेनं चित्रपट करण्यासाठी कलेजा लागतो, जो फक्त आमच्या बाबूजी अर्थात स्वरगंधर्व सुधीर फडके आणि तुमच्याकडे आहे!! आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येनं चित्रपटगृहात प्रेक्षक गर्दी करीत आहेत हे पाहून खूप आनंद झाला!!".
 

sunil barve 
 
दरम्यान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २९ मार्च रोजी मराठीत देखील प्रदर्शित झाला. मराठीतील खास शोला मराठी कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती, ज्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर सुबोध भावे, सुप्रिया पिळगांवकर, रवी जाधव, मुग्धा वैशंपायन, राहूल देशपांडे अशा अनेक मराठी कलाकारांनी चित्रपटाचे आणि दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांचे कौतुक केले आहे.