राम भजन ऐकून कट्टरपंथीयांना राग अनावर!, पोलिसांवर केली दगडफेक

    01-Apr-2024
Total Views |
muslim-mob-attack-hindus-sagar-madhya-pradesh
 
 
नवी दिल्ली :     ई-रिक्षावर भगवान रामाचे गाणे वाजवणाऱ्या रिक्षाचालक राहुल व साथीदार सौरभला मारहाण करून दगडफेक करण्याचा प्रकार मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात घडला आहे. सागर जिल्ह्यात जातीयवादास खतपाणी घालत हिंसाचार माजविण्याचा प्रयत्न त्याच परिसरात मुस्लीम समाजातील काहीजणांकडून करण्यात आला आहे. यावेळी काहींनी दगडफेकदेखील केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, परिसरात दगडफेक रोखण्याच्या प्रयत्नात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. दि. ३० मार्च २०२४ रोजी घडलेल्या या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करत आरोपींच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याची मागणी केली आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर आतापर्यंत १५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.


हे वाचलंत का? - ज्ञानवापी प्रकरण : मुस्लिम पक्षाला सुप्रीम कोर्टाचा दणका!, भोजशाळा सर्वेक्षण सुरुच राहणार


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सागर शहरातील १२ मुहाल भागात ही घटना घडली असून रंगपंचमीच्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास २७ वर्षीय ई-रिक्षाचालक राहुल राठौर व त्याचा साथीदार सौरभसह १२ मुहाल परिसरातून जात होता. त्याचवेळेस ई-रिक्षात भगवान रामाचे गाणे वाजत होते. त्याच परिसरात मुस्लीम समाजातील काही लोकांनी राहुलला अडवले आणि गाणे बंद करण्यास सांगितले. गाणे थांबवल्यानंतरही सुमारे १०० हल्लेखोरांच्या जमावाने त्याला मारहाण सुरू केल्याचा राहुलचा आरोप आहे.
 
दरम्यान, १२ मुहाल भागातील मुस्लिम जमावाकडून त्यांच्या घरांवर दगडफेक करत कुऱ्हाडी आणि तलवारीही उगारल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. काहींनी दगडफेक करून ई-रिक्षाही फोडली. यावेळी जमाव नियंत्रणाबाहेर जात परिसरात राहणाऱ्या गुड्डू माळी यांच्या दुकानात पोहोचला. फूल विक्रेते गुड्डू माळी यांच्या छातीत वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात गुड्डू जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.