आरटीआयच्या माध्यमातून केजरीवाल सरकारचा आणखी एक घोटाळा उघड!

    01-Apr-2024
Total Views |
aap-kejriwal-governent-delhi-arogya-scheme
 
 
नवी दिल्ली :     दिल्ली सरकारने 'दिल्ली आरोग्य कोष' योजनेबाबत जनतेची दिशाभूल केल्याचे माहिती अधिकारा(आरटीआय)च्या माध्यमातून समोर आले आहे. गेल्या सहा वर्षांत एकूण ६ हजार जणांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे आरटीआयमधून उघडकीस आले आहे. गेल्या एका वर्षात १ लाख १३ हजार ६९३ जणांना उपचार दिल्याची माहिती दिल्ली सरकारकडून देण्यात येत होती.
दरम्यान, आरटीआयच्या माध्यमातून दिल्ली सरकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आला असून इंडियन एक्स्प्रेसमधील सूत्रांनी या योजनेचा लाखो लोकांना फायदा झाल्याचे वृत्त दिले होते. विशेष म्हणजे दि. ३१ मार्च २०१८ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत ६,०९९ रुग्णांनाच मोफत उपचार देण्यात आले आहेत, असे आरटीआयमधून कळते आहे.


हे वाचलंत का? - राम भजन ऐकून कट्टरपंथीयांना राग अनावर!, पोलिसांवर केली दगडफेक

 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली असून आता पुन्हा एकदा आरटीआयद्वारे केजरीवाल सरकारची फसवणूक उघडकीस आली आहे. विवेक पांडे यांनी मार्चमध्ये दाखल केलेल्या आरटीआयमध्ये सरकारने 'दिल्ली आरोग्य कोष' योजनेबाबत जनतेची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे.

२०१८ ते २०२४ दरम्यान मागील सहा वर्षांत दिल्ली सरकारच्या 'आरोग्य डाक योजने' अंतर्गत किती लोकांना मोफत उपचार मिळाले आणि त्यासाठी किती खर्च आला, याचे उत्तर विवेक यांनी त्यांच्या आरटीआयमध्ये मागितले होते. दि. ११ मार्च २०२४ रोजी आरटीआयला उत्तर आले जे दिल्ली सरकारकडून मीडियाला दिलेल्या माहितीपेक्षा पूर्णपणे वेगळे, विसंगत होते.