या महिन्यात शाओमी हायपर ओएसचे 'या' डिव्हाईसला रोलआऊट होणार!

कंपनीने एक्स वर पोस्ट करत घोषित केले

    01-Apr-2024
Total Views |

Xiomi hyper os
 
 
मुंबई: मागील वर्षीच्या शेवटी शाओमी हायपर ओएस ही ऑपरेटिंग सिस्टिम शाओमी कंपनीने रोल आऊट केली असताना या एप्रिलपर्यंत आणखी काही मॉडेलसाठी हायपर ओएस रोल आऊट होणार आहे. काही मोबाईल डिव्हाईसला ही ओएस उपलब्ध होती. पोको एक्स ६ प्रो ( Poco X 6) शाओमी १३ प्रो (Xiomi 13 Pro) यांंना जुन्या एमआययुआय (MIUI) वरून हायपर ओएसची ( Hyper Os) ची अपग्रेड मिळाली होती.
 
 
 
याशिवाय शाओमी १३ प्रो ( Xiomi 13 Pro) , शाओमी पॅड ६ ( Xiomi Pad 6) या डिव्हाईसलादेखील अपडेट जानेवारीतच आलेली आहे. कंपनीने आणखी काही मॉडेलसाठी हायपर ओएस रोल आऊट करणर असल्याचे एक्सवर पोस्टर म्हटले आहे.
 
 
खालील मॉडेलसाठी हायपर ओएस येणार
 
शाओमी ११ अल्ट्रा, शाओमी ११ टी प्रो, मी ११ एक्स, शाओमी ११ लाईट, शाओमी ११ लाईट, मी १०, शाओमी पॅड ५, रेडमी के ५० आय, रेडमी १३ सी सिरिज, रेडमी १२, रेडमी ११ प्राईम जी, रेडमी नोट ११ सीरिज इत्यादी मोबाईल व डिव्हाईसेसला नवी अपडेट लवकरच मिळणार आहे.