‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झेंडा, २० कोटींच्या पुढे केली कमाई!

    01-Apr-2024
Total Views |
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाने जगभरात २० कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला.
 

savarkar  
 
मुंबई : रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने कमी कालावधीत उत्तम यश मिळवले आहे. बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई करत या (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. २२ मार्च रोजी हा चित्रपट हिंदी भाषेत आणि २० मार्च रोजी हा चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित झाला. आत्तापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली त्याची आकडेवारी समोर आली आहे.
 
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाने पहिल्या दिवशी १.०५ कोटी, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.०७ कोटी, चौथ्या दिवशी, २.१५ कोटी, पाचव्या दिवशी, १.०५ कोटी, सहाव्या दिवशी, १ कोटी, सातव्या दिवशी १.१५ कोटी कमवत पहिल्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने एकूण ११.३५ कोटी कमावले. तर दुसऱ्या आठवड्यात आठव्या दिवशी १.०१ कोटी, नवव्या दिवशी १.०५ कोटी, दहाव्या दिवशी १.७५ कोटी कमवत एकूण १५.७० कोटी कमावले आहेत. तर जगभरात २१.४५ कोटींची कमाई केली आहे.
 
 
 
काय आहे सुनील बर्वे यांची पोस्ट?
 
सुनील बर्वे यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिले आहे की, "वो कायर क्या जाने उन आसूओंकी कीमत जो वतन के लिए छलकते है!! अभिनंदन रणदीप हुडा, ह्या थोर स्वातंतत्र्यवीराचं चरित्र चित्रपटाच्या माध्यमामातून जगासमोर आणल्याबद्दल!! सावरकरांबद्दल इतक्या समर्पित भावनेनं चित्रपट करण्यासाठी कलेजा लागतो, जो फक्त आमच्या बाबूजी अर्थात स्वरगंधर्व सुधीर फडके आणि तुमच्याकडे आहे!! आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येनं चित्रपटगृहात प्रेक्षक गर्दी करीत आहेत हे पाहून खूप आनंद झाला!!".