'शैतान' चित्रपट आता OTT गाजवणार; कधी? कुठे? जाणून घ्या...

    01-Apr-2024
Total Views |
विकास बहल दिग्दर्शित ‘शैतान’ चित्रपट आता ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.
 

shaitaan  
 
मुंबई : अंधश्रद्धा आधारित अजय देवगन आणि आर.माधवन यांच्या ‘शैतान’ (Shaitaan) चित्रपटाने २०२४ या वर्षात धुमाकुळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत या (Shaitaan) चित्रपटाने प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला. चित्रपटगृह दणाणून सोडणारा ‘शैतान’ (Shaitaan) चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
 
दरम्यान, शैतान हा चित्रपट २०२३ रोजी 'वश' हा गुजराती चित्रपट आला होता, त्याचाच हिंदी रिमेक शैतान आहे असे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार शैतान चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. अंदाजे ३ मे रोजी हा चित्रपट ओटीटीवर येणार असल्याचे सुतोवाच करण्यात आले आहे. दरम्यान, ‘शैतान’ चित्रपटाने आत्तापर्यंत १३७ कोटींची कमाई केली आहे. काळीजादू, अंधश्रद्धा या सगळ्यांचा सामना एक सामान्य कुटुंब कसं करतं आणि शेवटी विजय हा सत्याचाच होतो असे थोडक्यात 'शैतान' चित्रपटाचे कथानक आहे.