टोयोटा किर्लोस्कर वाहनांची मार्चमध्ये रेकॉर्ड ब्रेक विक्री !

२०२३ तुलनेत मार्च २०२४ मध्ये २१७८३ युनिट्सवरून २२९१० युनिट्सची विक्री

    01-Apr-2024
Total Views |
 
Toyota
 
 
मुंबई: टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या वाहन विक्रीत वाहनांची रेकोर्डब्रेक युनिट विकली गेली आहेत. मार्च महिन्यात होलसेलमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या डिसपॅच केलेल्या युनिट्स मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत ही वाढ २५ टक्क्याने वाढली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, मार्च २०२३ तुलनेत मार्च २०२४ मध्ये २१७८३ युनिट्सवरून २२९१० युनिट्सची विक्री कंपनीकडून करण्यात आली आहे. 
 
आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये कंपनीने ४८ टक्क्याने अधिक युनिट्सची विक्री केली आहे. आर्थिक वर्ष २२-२३ मधील १७७६८३ युनिट विक्रीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये २६३५१२ युनिट्सची विक्री कंपनीने नोंदवली आहे.
 
या विक्रीबाबत प्रतिक्रिया देताना, 'आम्ही २०२३-२४ आर्थिक वर्ष आणि मार्च २०२४ साठी अनुक्रमे २६३५१२ आणि २७१८० च्या सर्वोच्च युनिट्सची नोंद करून आमच्या दोन्ही घाऊक विक्री बंद केल्याबद्दल रोमांचित आहोत," टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) उपाध्यक्ष, विक्री-सेवा-वापरलेल्या कार व्यवसाय साबरी मनोहर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
 
ग्राहकाभिमुख दृष्टीकोन ठेवून, विविध ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा आणि बाजारपेठेतील ट्रेंडचे आकलन करण्यात, समजून घेण्यात कंपनी नेहमीच पुढे राहिली आहे, त्यांना आमच्या दर्जेदार उत्पादने आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीसह सर्वोत्तम सेवा देण्यात आली आहे, असेही ते पुढे म्हणाले.
 
टोयोटा किर्लोस्कर ही टोयोटा मोटर्स कॉर्पोरेशनची भारतीय कंपनीचे युनिट आहे. कंपनीचे सध्या दोन उत्पादन प्रकल्प भारतात सुरू आहे. भविष्यात अजून एक युनिट सुरू करण्यासाठी कंपनीच्या हलाचाली सुरु आहेत. सध्याच्या दोन युनिटची वाहन उत्पादक क्षमता एकत्रितपणे ३.४२ लाख युनिट्स पर्यंत आहे.