‘ओपनहायमर’ चित्रपट म्हणजे प्रोपोगंडा – रणदीप हुड्डा

    01-Apr-2024
Total Views |

randeep
 
 
मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सध्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणारे क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांची संघर्षगाथा स्वातंत्र्यवीर सावरकर या चरित्रपटात दिग्दर्शक रणदीप हुड्डा (Randeep Hodda) यांनी मांडले आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. प्रमोशनदरम्यान रणदीपने (Randeep Hodda) एका मुलाखतीत ओपनहायमर चित्रपटावर ताशेरे ओढले आहेत. हा चित्रपट केवळ प्रोपोगंडा चित्रपट होता आणि यात केवळ एकच बाजू दाखवण्यात आली असे रणदीपने म्हटले.
 
रणदीप हुड्डा या मुलाखतीत म्हणाला की, “ हिरोशिमा, नागासाकी येथे बॉम्बस्फोट झाला, तेव्हा जपानमधील ती वेदनादायक रात्र कोणाला आठवत नाही का? अमेरिकेचा विश्वास आहे की तो सर्वोत्तम देश आहे आणि त्यांची आर्मी बलवान आहे. त्यांच्या मते जर्मन आणि जपानी लोक वाईट आहेत. इतिहासातही असेच काहीसे लिहिलं गेलं आहे. अमेरिकेने आजवर त्यांच्या देशातील नायकांवर चित्रपट बनवले. 'ओपनहायमर' चित्रपटात चांगुलपणाबद्दल सांगण्यात आले. आपण अनेकदा आपल्या देशाच्या वीरांवर प्रश्न उपस्थित करत असतो. 'ओपनहायमर' चित्रपटात नाण्याच्या दोन्ही बाजू नाही, तर एकच बाजू दाखवण्यात आली आहे. त्याच्या मते, फक्त एखाद्याचा चांगुलपणा दाखवणे सोपे आहे.''
 
ओपनहायमर चित्रपटाचे कथानक जगातील पहिला अणुबॉम्ब तयार करणाऱ्या व्यक्तिबद्दल आहे. तसेच, या चित्रपटाला यंदाच्या ऑस्करच्या १३ श्रेणींमध्ये नामांकने मिळाली होती. तर यापैकी ७ श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला.