डोळ्यावर गॉगल आणि हातात चार घड्याळं, 'थलायवर १७१' मधील रजनीकांत यांचा लूक वायरल

    01-Apr-2024
Total Views |
अमिताभ बच्चन आणि रजनीकांत ३३ वर्षांनी दिसणार एकत्र, पुन्हा एकदा दोन सुपरस्टार प्रेक्षकांचे करणार तुफान मनोरंजन
 

rajanikanth 
 
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचे चाहते त्यांची पूजा करतात. वयाची सत्तरी जरी पार केली असली तरी आजही प्रमुख नायक म्हणूनच ते चित्रपटांत झळकतात. ‘जेलर’ चित्रपटाचा फिव्हर अजूनही त्यांच्या (Rajinikanth) चाहत्यांवर कायम असतानाच त्यांचा ‘थलायवर १७१’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मास्टर’, ‘विक्रम’ आणि ‘लिओ’, सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे लोकेश कनागराज यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘थलायवर १७१’ (Thalaivar 171) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, या चित्रपटातील रजनीकांत यांचा हटके लूक सध्या सोशल मिडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे.
 
‘थलायवर १७१’ मधील रजनीकांत यांचा जबरदस्त लूक चाहत्यांना वेड लावणारा आहे. डोळ्यांवर गॉगल, हातात चार घड्याळं आणि चेहऱ्यावर हटके अॅटिट्युड असा रजनीकांत यांचा चित्रपटातील लूक प्रदर्शित करण्यात आला असून स्वत: लोकेश कनागराज यांनी देखील हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
 
 
 
लोकेश कनागराज आणि रजनीकांत यांनी २०२३ मधील सप्टेंबर महिन्यात ‘थलायवर १७१’ या चित्रपटाची घोषणा केली होती. अदयाप प्रदर्शनाची तारीख गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. तसेच, ‘थलायवर १७१’ हे या चित्रपटाला तात्पुरत्या स्वरुपात दिलेले नाव असून लोकेश कनागराज या चित्रपटाच्या अधिकृत नावाची घोषणा २२ एप्रिल रोजी करणार असे सांगितले जात आहे. चित्रपटाची कथा लोकेश यांनी लिहिली आहे.तसेच या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील त्यांनीच केले आहे.
 
३३ वर्षांनंतर दोन दिग्गज दिसणार एकत्र
 
हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे देव म्हणजे रजनीकांत तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. ‘थलाईवर १७१’ या चित्रपटात हे दोघे एकत्र काम करणार असल्याची आनंदाची बातमी स्वत: रजनीकांत यांनी ट्विट करत दिली आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. यात रजनीकांत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत.
 
अमिताभ आणि रजनीकांत यांनी यापुर्वी ‘हम तुम’, ‘गिरफ्तार’ आणि ‘अंधा कानून’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या ‘थलाईवर १७०’ या चित्रपटात रजनीकांतसह अमिताभ बच्चव राणा डग्गूबाती, फहाद फाजील महत्वपूर्ण भूमिका साकारणार असून पुन्हा एकदा संगीतकार अनिरुद्धचे संगीत चित्रपटाला लाभणार आहे.