देशाची अर्थव्यवस्था सुदृढ स्थिर व प्रगतीशील राहण्यासाठी आरबीआयचा प्रयत्न - शक्तिकांता दास

आरबीआयच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले वक्तव्य

    01-Apr-2024
Total Views |

RBI anniversary
 
 
मुंबई: भारताची अर्थव्यवस्था पुढील दशकातही सुदृढ स्थिर व प्रगतीशील राहण्यासाठी आरबीआयचा प्रयत्न असणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे. गेले अनेक वर्षे रिझर्व्ह बँके ऑफ इंडिया ( RBI) आर्थिक समृद्धीचे स्थैर्याचे प्रतिक बनले आहे असे गौरवोद्गार दास यांनी कार्यक्रमात बोलताना काढले आहेत. या प्रमुख कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
 
आरबीआयच्या ९० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात दास बोलत होते. ' १०० व्या वर्षांपर्यंत पदार्पण करताना आरबीआयने टिकाऊ अर्थव्यवस्था राखण्यासाठी कटीबद्ध असल्याचे म्हटले आहे.
 
आरबीआयच्या काळानुरूप आर्थिक व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत असून वेळोवेळी आरबीआय महत्वाचे निर्णय घेत असते. भविष्यातील काळाची नांदी लक्षात घेता सुधारणाप्रत निर्णय घेत असणे. किंबहुना भविष्यातील धोका ओळखून त्यावर आवश्यक त्या प्रतिकारक तरतूदी करत असते. आरबीआय देशाच्या आर्थिक सुधारणेसोबत देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कार्यरत आहे. ' असे उद्गार याप्रसंगी शक्तिकांता दास यांनी काढले आहेत.
 
याशिवाय आर्थिक सुधारणा करण्याबाबत भाष्य करताना दास म्हणाले, ' आरबीआयने इन्सोलवंसी बँकरपट कोड ( Insolvency and Bankruptcy Code) चे सादरीकरण व महागाई दर नियंत्रणाबद्दल केलेले उपक्रम ही त्यांची उदाहरणे असून येणाऱ्या काळात किंमतीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआय निर्णय घेईल ' असे वक्तव्य त्यांनी कार्यक्रमात बोलताना केले.
 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जागतिक प्रभाव कमी करण्यासाठी पुढील दशकात भारताने आर्थिक स्वावलंबन साध्य करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने जूनमध्ये तिसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर लक्षणीय रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या दशकभरात त्यांचे सरकार आणि आरबीआयच्या संयुक्त प्रयत्नांना श्रेय देत बँकिंग क्षेत्रातील प्रगतीवर मोदींनी प्रकाश टाकला आहे.
 
याविषयी अधिक बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी , ' त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सकल एनपीए मध्ये 2018 मध्ये सुमारे ११.२५ % वरून सप्टेंबर 2023 पर्यंत ३% पेक्षा कमी झाल्याचे नमूद केले. मोदींनी "ट्विन-बॅलन्स शीट" समस्येवर इलाज शोधला असल्याचे आश्वासन देत पत वाढीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे श्रेय आरबीआयला दिले आहे.
 
गेल्या काही वर्षांमध्ये, RBI च्या जबाबदाऱ्यांमध्ये धोरणे व्यवस्थापित करणे, वित्तीय क्षेत्राचे नियमन आणि पर्यवेक्षण करणे, परकीय चलनाची देखरेख करणे, चलन जारी करणे, पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमचे पर्यवेक्षण करणे असे अनेक व्यवहार यात समाविष्ट आहे. आरबीआयने केलेल्या कामकाजाला निर्मला सीतारामन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरबीआयच्या कार्याला दाद देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.