पाँडिचेरी विद्यापीठात सीता मातेचा अपमान!

तीव्र निदर्शने करत अभाविपकडून निवेदन जारी

    01-Apr-2024
Total Views |

ABVP Pondicherry University

पाँडिचेरी :
पाँडिचेरी विद्यापीठातील (Puducherry University) परफॉर्मिंग आर्ट्स विभागाने शुक्रवार, दि. २९ मार्च रोजी सनातन धर्म आणि पूज्य हिंदू देवतांचा अपमान केल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. 'एझिनी २०२४' या वार्षिक सांस्कृतिक उत्सवादरम्यान 'सोमयानम' नावाचे एक नाटक सादर केले. ज्यामधून प्रभू श्रीराम, सीता माता आणि भगवान हनुमंतासारख्या हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठात तीव्र निदर्शने करत यासंदर्भात निवेदन जारी केले आहे.

रामायण आणि त्यातील पात्रांच्या पावित्र्याचा अशी स्पष्ट अवहेलना हे या महाकाव्याला सर्वोच्च मानणाऱ्या लाखो लोकांच्या श्रद्धेचा अत्यंत आक्षेपार्ह आणि अनादर करणारे आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमधील कम्युनिस्ट आणि डाव्या नेतृत्वाखालील संघटनांनी केलेले सुनियोजित कृत्य आहे. कम्युनिस्ट आणि डाव्या नेतृत्वाच्या संघटनांना जाणूनबुजून प्रभू रामाची बदनामी करायची होती आणि माँ सीतेच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे होते. असे अभाविपने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हे वाचलंत का? : "रामलीला मैदानावरचा मेळावा म्हणजे ‘भ्रष्टाचार्‍यांचा महामेळा’!"

मिळालेल्या माहितीनुसार, नाटकात सीतेचे पात्र 'गीता' म्हणून चित्रित केले असून हनुमानजीच्या चारित्र्याचा विपर्यास केल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, सीता मातेला रावणासोबत नृत्य करताना दाखविले आहे. तसेच सीतेच्या अपहरणाच्या दृश्यादरम्यान, 'मी विवाहित आहे, परंतु आपण मित्र होऊ शकतो' असे सातेच्या तोंडी उच्चारताना दाखवल्याचे अभाविपने म्हटले आहे. त्याशिवाय 'कंजनेय' म्हणून चित्रित केलेल्या हनुमंताची थट्टा करत त्यांच्या शेपटीला रामाशी संवाद साधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अँटेनाच्या रूपात चित्रित केले गेले आहे. या नाटकाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे नाटकाच्या विरोधात अभाविपने विद्यापीठ परिसरात जोरदार निदर्शने करत निर्णायक कारवाईची मागणी केली आहे.


अभाविपने केलेल्या महत्त्वपूर्ण मागण्या :

१) नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक, पुष्पराज (एमपीए प्रथम वर्ष) आणि त्यात सहभागी असलेले कलाकार मिथुन कृष्णा, श्रीपार्वती, आदित्य बेबी आणि विशाख भासी यांना धार्मिक उपहास आणि अनादराच्या भविष्यातील घटनांपासून रोखण्यासाठी तात्काळ बडतर्फ करावे.

२) परफॉर्मिंग आर्ट्स विभागाचे प्रमुख डॉ. शरवणन वेलू आणि इतर सहभागी प्राध्यापकांवर आक्षेपार्ह नाटकाच्या निर्मितीस परवानगी दिल्याबद्दल त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी.

३) अभाविप सर्व धर्मांच्या श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाच्या पावित्र्यासाठी अविचलपणे उभी आहे आणि पाँडिचेरी विद्यापीठाच्या प्रशासनाकडे पाँडेचेरी विद्यापीठाच्या शहरी नक्षलवाद्यांवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करत आहे.