"संजय राऊत नटरंगी नाच्या; देशातील जनता लायकी दाखवणार!"

    01-Apr-2024
Total Views |

Sanjay Raut 
 
मुंबई : "संजय राऊत नटरंगी नाच्या आहे. महाराष्ट्रातील जनता तुला तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही", असा हल्लाबोल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सोमवार, दि. १ एप्रिल रोजी केला आहे. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर यांच्याशी केली. राऊतांच्या या टीकेला प्रसाद लाड यांनी अतिशय शेलक्या शब्दांत उत्तर दिले.
 
प्रसाद लाड म्हणाले की, "नरेंद्र मोदी हे देशातील १३० कोटी जनतेचा स्वाभिमान आहेत. त्यांच्यावर हीन भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत नावाचा नाच्याला हे माहीत नाही. सकाळी उठून लिपस्टीक, पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही बोलतो. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करतो. अरे नटरंगी नाच्या महाराष्ट्र आणि देशातील जनता तुला चपलेने मारल्याशिवाय आणि तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही", अशी टीका त्यांनी केली.
 
हे वाचलंत का? -  "रामलीला मैदानावरचा मेळावा म्हणजे ‘भ्रष्टाचार्‍यांचा महामेळा’!"
 
ते पुढे म्हणाले की, "संजयजी तुम्ही अशा प्रकारचे हीन कृत्य परत केले, तर मी तुम्हाला 'जी' म्हणणार नाही. संज्या तुला संगतो, तुला मी सोडणार नाही," अशा शब्दात प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना इशारा दिला आहे.