मुंबई फिरवण्याच्या बहाण्याने बलात्कार; टॅक्सीचालक 'मोहम्मद खलील' पोलिसांच्या ताब्यात

    01-Apr-2024
Total Views |
 rape victim
 
मुंबई : मुंबईच्या दादर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुंबई दाखवण्याच्या बहाण्याने मतीमंद अल्पवयीन मुलीवर टॅक्सीचालकाने बलात्कार केल्याची घटना दादर परिसरात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या नराधाम टॅक्सीचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, या नराधाम टॅक्सीचालकाचे नाव मोहम्मद जलील खलील असे आहे. मोहम्मदचे वय ३३ वर्ष सांगण्यात येत आहे. तर पीडित मुलगी १५ वर्षांची असून ती मतीमंद आहे. गुरुवारी, दि. २८ मार्च २०२४ च्या रात्री एक वाजताच्या सुमारास पीडित मुलगी कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली. त्यानंतर तिला मोहम्मदने मुंबई फिरवण्याचे आमिष दाखवून कारमध्ये बसवले.
 
 
मुलगी कारमध्ये बसल्यानंतर मोहम्मदने गाडी निर्जनस्थळी नेऊन पीडितावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपीने पीडितेला पुन्हा तिला तिच्या घराजवळ सोडले. या घटनेनंतर पीडिताने घडलेला सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या घरच्यांनी दादर पोलीस ठाण्यात मोहम्मद विरोध तक्रार दाखल केली.
 
पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पीडित मुलीजवळ आरोपीने दिलेल्या मोबाईल क्रमांच्या आधारे आरोपीचा शोध घेत. आरोपी मोहम्मदला अटक केली. मोहम्मदविरोधात पोलिसांनी आयपीसी कलम ३७६ अंतर्गत आणि लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ पॉक्सोच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.