हवालदार 'फयाज'ने ठेवले गँगस्टर 'मुख्तार'साठी स्टेटस; गुंडाचा उदो उदो केल्यामुळे नोकरी जाणार?

    01-Apr-2024
Total Views |
 mukhtar ansari
 
लखनौ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका हवालदाराने गँगस्टर मुख्तार अन्सारीला निरोप देण्यासाठी दोन स्टेटस ठेवले होते. या स्टेटसमध्ये त्याने गुंडाचे कौतुक केले होते आणि दुसरीकडे मुख्तारने ज्या लोकांवर अत्याचार केले होते त्यांची खिल्ली उडवली होती. फयाज खान असे या हवालदाराचे नाव आहे. त्याने आपल्या स्टेटसमध्ये मुख्तार अन्सारीला शेर-ए-पूर्वांचल म्हटले. ज्यांचे पूर्वज मुख्तारला घाबरत होते तेच लोक आता योगी सरकारच्या जोरावर उड्या मारत आहेत, असेही तो म्हणाला होता.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, फयाज खानने मुख्तार अन्सारीसाठी दोन स्टेटस पोस्ट केले होते. एका स्टेटसमध्ये निरोप देताना त्याने लिहिले होते - "तो लोकांच्या हृदयात जिवंत राहील, आज त्याच्या मृत्यूवर शोक करू नका." पुढे येऊन लढण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते; कोणीतरी फसवून सिंहाला पिंजऱ्यात टाकून मारले. अलविदा शेर-ए-पूर्वांचल मुख्तार अन्सारी.”
 
हे वाचलंत का? -  लग्नांसाठी मुलगी, ५० हजार अन् नोकरी! आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्या पाद्रीचा कट उधळला
 
दुसऱ्या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिलं होतं - "ज्यांच्या पूर्वजांची चड्डी सिंहाच्या गर्जनेने ओली व्हायची, तेच आज बाबांच्या मायेचा नारा देत आहेत." हे दोन्ही स्टेटस पाहिल्यानंतर स्क्रीनशॉट्स घेऊन डीसीपीकडे तक्रार करण्यात आली. डीसीपींनी तत्काळ कारवाई करत फयाज खानच्या बडतर्फीचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवला. डीसीपी म्हणाले की, कॉन्स्टेबलने पोलिसांच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
 
ते म्हणाले की बीकेटी एसएचओने त्यांना पाठवलेल्या अहवालात फयान खानने उत्तर प्रदेश पोलिसांच्या सोशल मीडिया धोरणाचे आणि १९९१ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत कॉन्स्टेबल फयाज खानला निलंबित करण्याची परवानगी देण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले आहे.