७ प्रतिष्ठित कंपन्यांचे मागील आठवड्यात बाजारी भांडवल ६७२६० कोटीहून वाढले

सर्वाधिक वाढ रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ! २०१४१०.६३ कोटीवरून ४५२६२.५९ कोटींवर वाढले

    01-Apr-2024
Total Views |

Market Cap
 
 
मुंबई: शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या सात प्रतिष्ठित कंपन्यांचे बाजारी भांडवल (Market Capitalisation)गेल्या आठवड्यात ६७२५९.९९ कोटींवर पोहोचले आहे. सर्वाधिक मूल्यांकन रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये वाढल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. रिलायन्सचे मूल्यांकन २०१४१०.६३ कोटीवरून ४५२६२.५९ कोटींवर पोहोचले आहे.
 
एलआयसी (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) चे बाजारी भांडवल ५२१८.१२ कोटीवरून ५७८४८४.२९ कोटींवर पोहोचले आहे. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) चे बाजारी भांडवल ४१३२.६७ कोटीवरून ७६९५४२.६४ कोटींवर पोहोचले आहे.
 
एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) बाजारी भांडवलात ४०२९.६९ कोटीवरून ११००१८४.६० कोटींवर वाढले आहे. हिन्दुस्तान युनिलिव्हर (Hindustan Unilever) २८१९.५१ टक्क्यांवरुन ५३२९४६.०४ कोटींवर पोहोचले आहे. भारती एअरटेलचे मूल्यांकन ३८१७.१८ कोटींवरून वाढत ६९५०३८.४८ कोटीवर पोहोचले आहे.
 
या रिलायन्स, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, एलआयसी , आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांचे बाजारी भांडवल ६७२५९.९९ कोटींहून अधिक वाढले आहे.