ताडदेव परिसरात नागरिक रस्त्यावर! मंत्री लोढांनी घेतली आंदोलनाची दखल

    01-Apr-2024
Total Views |

Lodha 
 
मुंबई : वेगवेगळ्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉय विरोधात ताडदेव परिसरात असलेल्या तुलसी मार्गावर आर्य नगर, जनता नगर येथील स्थानिक नागरिकांनी आंदोलन पुकारले होते. कॅबिनेट मंत्री आणि येथील स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सदर ठिकाणी ३१ मार्च रोजी भेट देत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
 
याठिकाणी १०० हून अधिक दुचाकीस्वार रात्रभर फिरत असतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना कर्कश आवाज, वर्दळ आणि असुरक्षितता अशा नानविध समस्यांना दररोज तोंड द्यावे लागते. याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. परंतु यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी आंदोलन पुकारले.
 
हे वाचलंत का? -  प्रकाश आंबेडकर आणि नाना पटोले यांच्यात खडाजंगी! एकमेकांवर केले गंभीर आरोप
 
दरम्यान, याविषयी बोलताना मंत्री लोढा म्हणाले की, "येथील नागरिकांना कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली असून पोलिसांनी त्यांना सहकार्य करावे अशी त्यांची अपेक्षा आहे. हा माझा मतदारसंघ आहे, येथील लोकांमुळे मी आमदार आहे त्यामुळे त्यांना कोणताही त्रास होऊ नये ही माझी जबाबदारी आहे," असे ते म्हणाले.
 
 
 
स्थानिक आमदार या नात्याने मंगल प्रभात लोढा यांनीदेखील नागरिकांची बाजू घेत आंदोलनाला आपला पाठिंबा दिला. अखेर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली. तसेच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.