जी २० राष्ट्रात भारताची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगवान

भारताचा अर्थव्यवस्थेतील विकासदर ८ टक्क्यांहून अधिक राहण्याचे अर्थमंत्र्यांचे संकेत

    01-Apr-2024
Total Views |

Nirmala Sitharaman
 
 
मुंबई: एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्था जानेवारी ते मार्च या तिमाहीत अर्थव्यवस्था ८ टक्क्याने वाढणार असल्याचे भाकीत केले आहे तसेच सध्याच्या घडीला भारत जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनली असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
 
सध्याच्या काळात भारत सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्था बनली असू़न पहिल्या तिमाहीत ७.१ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ७.६ टक्के व तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्क्याने विकासदर राखून भारतीय अर्थव्यवस्था आगेकूच करणार असल्याचे चित्र दिसत आहे.
 
शनिवारी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, ' भारत जानेवारी मार्च तिमाहीत ८ टक्क्याने वाटचाल करणार आहे. भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२७ पर्यंत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास सीतारामन यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.
 
तिसऱ्या तिमाहीत विकास दर अपेक्षेहून अधिक राहिला होता. नुकतेच गोल्डमन सचने ने भाकीत केल्यानुसार २०२४ मध्ये अर्थव्यवस्था ६.६ टक्क्याने वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. मागील विकासदरापेक्षा १० बेसिस अंशाने अर्थव्यवस्थेत वाढ होण्याची शक्यता गोल्डमन सचने वर्तवली होती. मॉर्गन स्टॅनलीने व मूडी अहवालात देखील भारताच्या विकास दरात यावेळी वाढ होण्याची शक्यता वर्तवली होती.
 
मॉर्गन स्टॅनलीने अर्थव्यवस्थेत ६.१ ते ६.८ पर्यंत विकासदर वाढण्याचे अनुमान वर्तवले होते तर एस अँड पी ने दर ६.१ ते ६.४ टक्के राहण्याची शक्यता सांगितली होती. मूडीने विकासदर ६.६ ते ८ टक्के विकासदर राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
 
मूडिजने भारत जी २० मधील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचे अनुमान व्यक्त केले आहे. सरकारने फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात ११.११ लाख कोटींचा भांडवली खर्च करणार असल्याचे सांगितले होते.
 
मोदी सरकारने अर्थव्यवस्थेत विकास दर ७.६ टक्क्यांवर राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मागील आकडेवारीनुसार मात्र दर्शविल्याप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था ८.२ टक्क्याने वाढली होती. सध्याचा विकास कालावधी पाहता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विकासदर ८ टक्क्यांहून अधिक राहण्याचे संकेत दिले आहेत.