हिंडनबर्गचा प्रभाव अदानी समुहावर 'नाकाम'अदानी समुहाचे वेगाने 'विस्तारीकरण '

आगामी काळात ७ लाख कोटींची इन्फ्रास्ट्रक्चर सु्विधेत गुंतवणूक करणार !

    01-Apr-2024
Total Views |

Gautam Adani
 
 
मुंबई: गेल्या वर्षी अदानी समुहावर हिंडनबर्ग शॉर्टसेलर कंपनीने शेअर्सच्या किंमतीत फेरफार केले असल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे थोड्या काळासाठी अदानी समुहाच्या समभागात घसरण होत त्याचा फटका समुहाला बसला होता. परंतु आता त्यावर मात करत अदानी समुहाने जोरदार वापसी करत आपले विस्तारीकरण सुरू केले आहे. याचा प्रत्यय म्हणजे ओरिसात कॉपरचा प्रकल्प उभारत तसेच अंबुजा सिमेंटमधील हिस्सेदारी वाढवत कंपनीवर नियंत्रण मिळवले याशिवाय आपल्या मध्यप्रदेश मधील प्रकल्पात रिलायन्सने अदानी समुहाशी केलेली गुंतवणूकीतून जवळीक पाहता गेल्या सहा महिन्यांपासून हिंडनबर्गचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
याशिवाय जय अदानी यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने गोपाळपूर पोर्टचे अधिग्रहण केले आहे.गोपालपूर पोस्टमध्ये ९५ टक्के समभागांचे भागभांडवल खरेदी करत ३३५० कोटीची गुंतवणूक पूर्वी किनारी भागात करण्यात आली होती. अंबुजा सिमेंटमधील ३.५ टक्क्यांवरुन भागभांडवल वाढत ६६.७ टक्क्यांवर वाढवले गेले. याशिवाय खावडा गुजरात येथे ७७५ मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.
 
गौतम अदानी यांच्याकडून खाण, कोळसा, मुलभूत सुविधा, विमानतळ, पोर्ट, या क्षेत्रातील गुंतवणूकीत त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. २०२२ मध्ये मिडिया क्षेत्रात घौडदौड सुरु ठेवत एनडीटीव्हीचे अधिग्रहण केले आहे.
 
हिंडनबर्गने केलेल्या आरोपानंतर अदानी समुहाने आपल्या कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे वेळोवेळी सांगायचे होते. त्यातील रणनीतीचा एक भाग म्हणून कंपनीने अनेक व्हेंचरमध्ये गुंतवणूक करतानाच आपल्या थकबाकीचे देये चुकवली आहे. हिंडनबर्ग प्रकरणानंतर अदानी समुहाने ४१५०० कोटींचा निधी उभा केला होता.
 
याशिवाय मागील अधिग्रहाच्या आधी समुहाने संघी सिमेंट (४३ दशलक्ष डॉलर्स), इंडियन ऑइल टैंक (१२८ दशलक्ष डॉलर्स) कराईकाल पोर्ट (१८१ दशलक्ष डॉलर्स) कोस्टल एनरजेन (४२० दशलक्ष डॉलर्स) या प्रकल्पात अदानी समुहाने गुंतवणूक केली होती. कंपनीने गुंतवणूकदारांना सादर केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये अदानी समुह पायाभूत सुविधेत ७ लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.