जीएसटी कलेक्शन मार्चमध्ये ११.५ टक्क्याने वाढत १.७८ लाख कोटींवर

इयर बेसिसवर कलेक्शनमध्ये ११.५ टक्क्याने वाढत जीएसटीचे संकलन १.७८ लाख कोटींपर्यंत

    01-Apr-2024
Total Views |

gst
 
मुंबई: जीएसटी कलेक्शनसंबंधी मोठी बातमी प्रसारमाध्यमांनी दिली आहे ‌ मार्चमध्ये जीएसटी (Good and Sales Tax) मधील कलेक्शनमध्ये ११.५ टक्क्याने वाढ होत जीएसटीचे संकलन (Collection) १.७८ लाख कोटींपर्यंत पोहोचल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
 
एप्रिल २३-२४ मध्ये देशाचे जीएसटी संकलन २०.१४ लाखांपर्यंत पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा ११.७ टक्क्याने जीएसटी कलेक्शन वाढले आहे. दरमहा कर संग्रहणात १.६८ लाखांपर्यंत पोहोचले असून मागील १.५ लाख कोटींच्या तुलनेत संग्रहणात वाढ झाली आहे.
 
मार्च २०२४ साठी एकूण वस्तू आणि सेवा कर (GST) महसुलात वार्षिक ११.५ टक्के वाढीसह १.७८ लाख कोटी इतके दुसरे सर्वोच्च संकलन झाले आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून जीएसटी संकलनात १७.६ टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाल्यामुळे ही वाढ झाली आहे',असे अर्थमंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
 
संग्रहणातील वर्षवार आकडेवारी -
 
एप्रिल २३ - १.८७ लाख कोटी
मार्च २४ - १.७८ लाख कोटी
जानेवारी २०२४ - १.७४ लाख कोटी
ऑक्टोबर २०२३ - १.७२ लाख कोटी
फेब्रुवारी २०२४- १.७ लाख कोटी
 
एप्रिल २०२३ मध्ये सर्वाधिक सीएसटी संकलनात वाढ होत संकलन १.८७ लाख कोटींवर पोहोचले आहे.