मुंबई : हिंदकेसरीला ललकारण्याचं स्वप्न गल्लीतल्या काडीपैलवानानं पाहू नये, असा खोचक टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊतांना लगावला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत संजय राऊतांवर निशाणा साधला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "ज्या मोदीजींच्या नावाचा टिळा माथ्यावर मिरवून मागच्या निवडणुकांत मतं मागितली आणि जिंकून आलात, त्यांना या निवडणुकीत तडीपार करण्याची नुसती भाषा बोलताना तुमच्या तोंडाला आज फेस आला. तुमची मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचाराची पोतडी जनतेसमोर कधीचीच उघडी पडली आहे. त्यामुळे जनता छडी घेऊन तुमच्यावर तुटून पडू नये, म्हणून आमच्या तडीपारीच्या गमजा मारताय"
"जनतेचं बळ मोदीजींसोबत आहे. त्यामुळे भाजपची बरोबरी करण्याचं शिवधनुष्य तुम्हाला पेलवणार नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लढाई बरोबरीच्या पैलवानांत होते. हिंदकेसरीला ललकारण्याचं स्वप्न गल्लीतल्या काडीपैलवानानं पाहू नये," असा टोला त्यांनी लगावला आहे.
ज्या मोदीजींच्या नावाचा टिळा माथ्यावर मिरवून मागच्या निवडणुकांत मतं मागितलीत आणि जिंकून आलात, त्यांना या निवडणुकीत तडीपार करण्याची नुसती भाषा बोलताना तुमच्या तोंडाला आज फेस आला. तुमची मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचाराची पोतडी जनतेसमोर कधीचीच उघडी…
त्या पुढे म्हणाल्या की, "निवडणुकीच्या आखाड्यात तुम्हाला आम्ही एक तर अस्मान दाखवू नाही तर धुळीत मिळवू. त्यामुळे खयाली पुलाव शिजवून आपण काहीतरी चमत्कार घडवू, असली शेखचिल्ली स्वप्नं पाहू नका," असा सल्लाही त्यांनी संजय राऊतांना दिला आहे.