राज्यातील प्रत्येक बुथवर साजरा होणार भाजपचा स्थापना दिवस!

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

    01-Apr-2024
Total Views |

Chandrashekhar Bawankule 
 
मुंबई : येत्या ६ एप्रिल रोजी राज्यातील प्रत्येक बुथवर भारतीय जनता पक्षाचा ४५ वा स्थापना दिवस नागरिकांच्या सहभागाने उत्साहात साजरा केला जाणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. तसेच स्थापना दिनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते संकल्प करतील, असेही त्यांनी सांगितले.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मागील १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजप आघाडीच्या सरकारने भारताचा मान-सन्मान, संस्कृती आणि पंरपरा जोपासण्याचे अद्वितीय कार्य केले आहे. या कार्यकाळात गरीब, शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गियांच्या कल्याणासाठी ऐतिहासिक कार्य करण्यात आले आहे."
 
हे वाचलंत का? -  "संजय राऊत नटरंगी नाच्या; देशातील जनता लायकी दाखवणार!"
 
"भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील प्रत्येक कार्यालयात ध्वजारोहन केले जाणार आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते आपल्या घरावर भाजपचा ध्वज लावतील. तसेच पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार आहे. बुथ स्तरावर लाभार्थ्यांशी विशेष संपर्क अभियानही राबविले जाणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
 
ते पुढे म्हणाले की, "प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पक्षाच्या ध्वजासह पदयात्रा आणि बाईक रॅली काढण्यात येणार आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी आणि समाजातील प्रबुद्ध नागरिकांचा सहभाग असणाऱ्या सभा घेतल्या जातील. यातून मोदी सरकारच्या कामगिरीची चर्चा केली जाईल. यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रदेश, जिल्हा, मंडल स्तरावर योजनाबद्ध पद्धतीने कार्यक्रमाची आणखी करावी," असेही आवाहन बावनकुळेंनी केले आहे.
 
हे वाचलंत का? -  "रामलीला मैदानावरचा मेळावा म्हणजे ‘भ्रष्टाचार्‍यांचा महामेळा’!"
 
"विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी संपूर्ण देश मोदीमय झाला आहे. ‘फिर एक बार, मोदी सरकार, अबकी बार ४०० पार’ या आवाहनाच्या पूर्ततेसाठी भाजपाचे कार्यकर्ते अथक परिश्रम करण्याचा संकल्प या भाजपा स्थापना दिनानिमित्ताने करतील," असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.