टोरंटची मोठी घोषणा! सामाजिक कार्यासाठी ' इतक्या ' हजार कोटींची सीएसआर देणगी

पुढील पाच वर्षांत ५००० कोटी समाजाच्या उन्नतीसाठी खर्च करणार

    01-Apr-2024
Total Views |

Torrent Mehta
 
 
मुंबई: टोरंट समुहाचे संस्थापक (Promoter) मेहता कुटुंबाने सीएसआर अंतर्गत ५००० कोटींचे दान पुढील ५ वर्षात करण्याचे ठरवले आहे. यासंबंधीचे वृत्त ' बिझनेस स्टँडर्ड ' वृत्तसंस्थेने दिले असून मेहता कुटुंब आपल्या युएनएम (UNM) फाऊंडेशनच्या माध्यमातून करणार असल्याचे बातमीत म्हटले गेले आहे. कंपनीचे संस्थापक यु एन मेहता यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ही घोषणा टोरंट कंपनीकडून करण्यात आली आहे.
 
फार्मा व उर्जा या क्षेत्रातील मोठी कंपनी म्हणून ओळख असलेल्या टोरंट कंपनीने आरोग्य शिक्षण, पर्यावरण, कला, साहित्य, सामाजिक अशा विविध पातळ्यांवर ही मदत करण्याचे ठरवले आहे. नवीन आर्थिक वर्ष म्हणजेच १ एप्रिलपासून पुढील ५ वर्षासाठी ही मदत केली जाणार आहे.
 
गेले काही दिवस अनेक उदयोगपतींनी सीएसआर अंतर्गत मदतनिधीसाठी घोषणा केल्या होत्या. वंचित घटकांना मदतीसाठी हात पुढे करत बजाज समुहाने यापूर्वी ५००० कोटींची मदत पुढील ५ वर्षात करण्याचे ठरवले आहे. याबरोबरच स्किल डेव्हलपमेंट साठी बजाज बियोंड (Bajaj Beyond) या कार्यक्रमाची घोषणा बजाज समुहाने केली होती. आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा समुह व कुटुंबाने ५५० कोटींची मदत महिंद्रा विद्यापीठ व इंदिरा महिंदा स्कूल ऑफ एज्युकेशन या संस्थाना देऊ केली होती.
 
युएन मेहता हे युएन फाऊंडेशनचे संस्थापक होते. सामाजिक बदल घडवण्यासाठी त्यांनी या विना नफा तत्वावर या संस्थेची सुरूवात केली होती. या संस्थेमार्फत आरोग्य, सेवा, शिक्षण, कला, साहित्य क्षेत्रात आर्थिक व सामाजिक हातभार लावला जातो.