नवी दिल्ली : भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात आली. पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत यजमानांना धूळ चारली आहे. धरमशाला येथे या मालिकेतील अंतिम सामना भारताने एक डाव आणि ६४ धावांनी जिंकत ४-१ ने मालिका खिशात घातली. अंतिम सामना आर. आश्विनचा कसोटी कारर्किदीतील १००वा सामना होता. या सामन्यात आश्विनने ०९ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे दुसऱ्या डावात त्याने ५ बळी घेतले आहेत.
दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात २१८ धावा केल्या. या धावांच्या प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाने ४७७ धावा केल्या यात कर्णधार रोहित शर्मा(१०३) व शुभमन गिल(११०) या दोघांनी शतकी खेळी करत संघाला चांगली आघाडी मिळविण्यात योगदान दिले. इंग्लंड संघाला दुसऱ्या डावाची सुरूवात करताना टीम इंडियाने दिलेल्या २५९ धावांचा पाठलाग करताना अपयश आले.
मालिकावीर ठरलेल्या सलामीवीर यशस्वी जयस्वालने संपूर्ण मालिकेत २ द्विशतके आणि ३ अर्धशतकांच्या मदतीने ७१२ धावा करणाऱ्या यशस्वी खेळी केली. अंतिम कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव करत टीम इंडियाने मालिका ४-१ ने जिंकली. धर्मशाला येथे खेळवण्यात शेवटचा कसोटी सामना एक डाव आणि ६४ धावांनी जिंकून टीम इंडियाने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
११२ वर्षांनी भारताने रचला इतिहास!
इंग्लंडविरुध्दच्या ५व्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवित ४-१ ने मालिका जिंकली. पहिली कसोटी गमावल्यानंतरही टीम इंडियाने कसोटी मालिका जिंकली आहे. ११२ वर्षांच्या इतिहासातील टीम इंडिया हा पहिला संघ ठरला आहे. आजवरच्या इतिहासात फक्त तीन वेळा घडले आहे जेव्हा मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असतानाही संघांनी अखेरीस ४-१ ने मालिका जिंकली आहे. इंग्लंडने १९१२ मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुध्द अशी कामगिरी केली होती.
इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जिम्मीने गाठला ७०० विकेटचा टप्पा!
इंग्लंडचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसनने ७०० कसोटी विकेट्स घेत नवा विक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ७०० बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज म्हणून जेम्स अँडरसनचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल. तसेच, अशी कामगिरी करणारा पहिलाच इंग्लिश क्रिकेटर म्हणूनही त्याची ओळख जगभर झाली आहे. दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकन फिरकीपटू मुरलीधरन ८०० विकेट्स यांच्या नावावर आहे. त्यानंतर शेन वॉर्न ७०८ विकेट्स हे दोघेही फिरकीपटू आहेत. तिसऱ्या स्थानी ७०० विकेट्ससह जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनचे स्थान असणार आहे.