सुधा मुर्ती बनल्या राज्यसभा खासदार! मोदींनी ट्विट करत दिली माहिती...

08 Mar 2024 13:33:09
 Sudha Murthy
 
नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेवी सुधा मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर मनोनित केले आहे. सुधा मूर्ती यांची आणखी एक ओळख म्हणजे त्या प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर मनोनित करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयावर दिली. सुधा मूर्ती यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महिला शक्तीचा हा सशक्त पुरावा आहे.
 
ते म्हणाले, "भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती जी यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्याचा मला आनंद आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधा जी यांचे योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे. त्यांची राज्यसभेतील उपस्थिती हा आमच्या 'महिला शक्ती'चा एक पुरावा आहे..' आपल्या देशाचे नशीब घडवण्यामध्ये महिलांच्या सामर्थ्याचा आणि क्षमतेचा एक शक्तिशाली पुरावा आहे. मी त्यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो."
 
कोण आहेत सुधा मुर्ती?
सुधा मूर्ती या भारतीय शिक्षिका आणि लेखिका आहेत. याशिवाय त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षाही आहेत. त्यांचे लग्न इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांच्याशी झाले होते. २००६ मध्ये, मूर्ती यांना भारत सरकारने त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री, भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला होता. सुधा मुर्ती या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू आहेत. सुधा आणि नारायण मुर्ती यांच्या कन्या अक्षता मुर्ती या ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0