Stock Market Update : आज महाशिवरात्रीला शेअर बाजार बंद राहणार

08 Mar 2024 11:45:12

stock market
 
 
मुंबई: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आज महाशिवरात्रीला बंद राहणार आहे. आज कुठल्याही प्रकारचे 'ट्रेडिंग' आज होणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी आज विश्रांती घ्यावी लागेल.
 
उद्या सकाळी ९.१५ ला नेहमीच्या कालावधीत बाजार सत्र सुरू होणार आहे. इक्विटी, इक्विटी डेरिएटिव्ह (Derivatives), परकीय चलन (Forex) या सगळ्या प्रकाराचे व्यवहार बंद राहणार आहेत.
 
मात्र कमोडिटी, डेरिएटिव्ह, इलेक्ट्रोनिक गोल्ड रिसिट (Electronic Gold Receipts) हे व्यवहार संध्याकाळी पुर्ववत होतील. काल बाजारातील स्थितीविषयी संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या.
 
मार्केटमध्ये फारसा उत्साह नसला तरी काल सेन्सेक्सने ७४००० हजार पातळी ओलांडली तसेच निफ्टीने पहिल्यांदाच २२५०० ची पातळी पार केली होती. टाटा केमिकल्स, टाटा स्टील, टाटा पॉवर या कंपन्यांच्या समभागावर विशेष लाभ दिसून आयसीआयसीआय बँकेच्या समभागात घसरण झाली होती.
 
Powered By Sangraha 9.0