मुंबई: (International Women's Day)आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे गिफ्ट महिलांसाठी जाहीर केले आहे. आज पंतप्रधानांनी सिलेंडर गॅसच्या किंमतीत थेट १०० रूपयांची सूट देऊन समस्त महिला वर्गाला खूष केले आहे. भारतील घरावरील महागाईचा बोजा करण्यासाठी तसेच महिला नवशक्तीसाठी हा निर्णय घेतला असल्याचे मोदींनी सांगितले आहे.
'आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सरकारने एलपीजी (LPG) सिलेंडर गॅसच्या किंमतीत १०० रुपयाने कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे गॅसवरील खर्चाचा घरावरील आर्थिक भार कमी होणार असून महिलाशक्तीला याचा फायदा होईल.' असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी एक्सवर (ट्विटरवर) केले आहे
याआधी नुकतेच सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी उज्वला योजनेअंतर्गत प्रति एलपीजी गॅसमागे ३०० रूपये सबसिडीचा कालावधी वाढवला होता. १ एप्रिलपासून ही योजना सुरू राहणार आहे.
मुंबईतील गॅसची (Gas) किंमत ९०२.५० असून आता सुधारित किंमत ८०२.५० पर्यंत होऊ शकते. मात्र विरोधक इंडिया आघाडीने यावर टीका करत पेट्रोल भावात नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरल्याचे इंडिया आघाडीने म्हटले आहे.