दोन सख्ख्या अभिनेत्री बहिणींचं दुर्दैवी निधन, मालिकाविश्वात शोककळा

    08-Mar-2024
Total Views |
हिंदी मालिकाविश्वातील दोन अभिनेत्री ज्या सख्ख्या बहिणी आहेत त्यांचे ४८ तासांच्या अंतराने दुर्देवी निधन झाले आहे.
 
 
dolly and amandip
 
मुंबई : जागतिक महिला दिनाच्या दिवशी मनोरंजन क्षेत्रातून एक अत्यंत दुख:द बातमी समोर आली आहे. हिंदी मालिकांमध्ये (Hindi Tv serial) वैविध्यपुर्ण भूमिका निभावणाऱ्या दोन सख्ख्या अभिनेत्री बहिणींचे अवघ्या ४८ तासांत निधन झाले आहे. अभिनेत्री अमनदीप सोही (Amandeep Sohi) आणि डॉली सोही (Dolly Sohi) असे या दोन बहिणींची नावे असून अमनदीप हिचा मृत्यू कावीळने तर डॉलीचा मृत्यू सर्व्हायकल कर्करोगाने झाला आहे. मालिकाविश्वातून या दोन्ही अभिनेत्रींना आदरांजली वाहिली जात आहे.
 
अभिनेत्री डॉली सोही हिचा सर्व्हायकल कर्करोगामुळे वयाच्या ४८ व्या वर्षी दुर्दैवी अंत झाला आहे. डॉलीच्या सख्ख्या बहिणीचं  अमनदीप हिचं निधन तिच्या मृत्यूपुर्वी ४८ तास आधी काविळमुळे झाले होते. घरातील दोन्ही मुलींच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. डॉलीच्या पश्चात तिला एक मुलगी आहे.
 

dolly  
 
डॉली सोही हिने 'कलश', 'हिटलर दीदी', 'देवों के देव महादेव' यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये कामं केली होती. तर अमनदीप हिला ‘बतमीज दिल’ या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली होती.