'अदीना मशीद' प्रकरणी हरी शंकर जैन यांची मोठी मागणी

08 Mar 2024 12:17:26
Hari Shankar Jain Adina News - पश्चिम बंगालच्या तथाकथीत अदीना मशिदीत हिंदूंना पूजा करण्याचा मान मिळावा अशी मागणी हरी शंकर जैन यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. याठिकाणी मंदिराचे अवशेष सापडले असून साधारण ३२ पुरावे (फोटोग्राफ) हिंदू पक्षाच्या बाजूचे आहेत. 

Hari Shankar jain

नवी दिल्ली : ज्ञानवापी आणि श्रीकृष्णजन्मभूमी संदर्भात न्यायालयीन लढाई सुरु असतानाच पश्चिम बंगालमधील एका तथाकथीत मशिदीचे प्रकरण समोर आले आहे. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यामध्ये 'अदीना' नावाची एक मशीद शेकडो वर्षांपूर्वी भव्य हिंदू मंदिर तोडून उभारण्यात आली होती. मंदिराचे अवशेष आजही त्याठिकाणी आहेत. त्यामुळे हिंदूंना येथे पूजेचा मान मिळावा अशी मागणी हिंदु पक्षाची बाजू मांडणारे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील हरी शंकर जैन यांनी केली आहे.

सिकंदर शाह नामक शासकाने १३६४-७४ च्या कालखंडात हिंदू मंदिर तोडून त्याठिकाणी अदीना मशीद बांधली होती. मंदिराचे अवशेष येथे मिळाले असून एकूण ३२ पुरावे आहेत (फोटोग्राफ) जे याठिकाणी मंदिर असल्याची खात्री देतात. ही जागा सध्या एएसआयच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे हरी शंकर जैन यांनी पंतप्रधानांना आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे की, या तथाकथित मशिदीमध्ये हिंदूंना पूजेचा मान मिळाला पाहिजे. सोबतच जैन यांनी देशभरातील हिंदूंना यासाठी पुढे येण्याचे आवाहनही केले आहे.

Powered By Sangraha 9.0