नवी दिल्ली : शुक्रवारी, दि. ८ मार्च २०२४ दिल्लीतील इंद्रलोक परिसरात अनेक मुस्लिम रस्त्यावर नमाज अदा करतानाचा व्हिडिओ ऑनलाइन समोर आला. व्हिडिओमध्ये काही पोलिस अधिकारी रस्ता अडवत असल्याने त्यांना बाजूला होण्यास सांगत आहेत. तथापि, एक अधिकारी येतो आणि नमाज पठण करणाऱ्या माणसाला लाथ मारतो आणि त्याला जागेवरुन हटण्यास सांगतो.
३४ सेकंदांचा हा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे, जो असा दावा करताना ऐकू येत आहे की पोलीस मुस्लिमांना लाथ मारत आहे आणि पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला त्याच्या मुस्लिम ओळखीमुळे मारतो आहे. त्यांनी रस्ता अडवलेला नाही, त्यांच्या नमाज पठणामुळे कोणाचीही गैरसोय होत नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे, पोलिसाने त्या व्यक्तीला मारहाण केल्यानंतर, मुस्लिम जमावाने चिडून पोलिस कर्मचाऱ्याला घेरले. यानंतर अधिकारी आणि जमावामध्ये जोरदार वादावादी झाली. व्हिडिओच्या पार्श्वभूमीत काही आवाज ऐकू येत आहेत. पण त्यात जमाव नेमकं काय म्हणत आहे. हे स्पष्ट ऐकू येत नाही.
दरम्यान, नमाज पठण करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “इंद्रलोक येथे आज घडलेल्या घटनेत, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पोलीस चौकीतील अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. आवश्यक शिस्तभंगाची कारवाई देखील केली जात आहे.” अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.