उरण - वाहनाची कोल्ह्याला धडक; परिस्थिती गंभीर

07 Mar 2024 11:23:12
jackal



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
उरण तालुक्यातील खोपटे-जेएनपीटी रस्त्यावर बुधवार रात्री कोल्हा ( jackal ) जखमी अवस्थेत आढळून आला. ( jackal ) वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या या कोल्ह्याचा बचाव करुन त्याला पुढील उपचाराकरिता मुंबईत दाखल करण्यात आले. ( jackal )


उरण तालुक्यातील कांदळवनांमध्ये कोल्ह्याचा अधिवास आहे. येथील खोपटे-जेएनपीटी रस्त्यावर बुधवारी रात्री कोल्हा जखमी अवस्थेत आढळला. रस्ता ओलांडताना त्याला वाहनाची धडक लागली. त्यामुळे कोल्हा जबर जखमी झाला. वन विभागाला याविषयी माहिती मिळताच त्यांनी 'फाॅन' या वन्यजीव बचाव रेस्क्यू संस्थेला यासंदर्भातील माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कोल्ह्याची अवस्था गंभीर असल्याचे समजताच त्यांनी मुंबईतील 'राॅ' या वन्यजीव बचाव संस्थेला माहिती दिली. 'राॅ'च्या कार्यकर्त्यांनी जाऊन या कोल्ह्याचा बचाव केला. हा कोल्हा नर असून त्याची परिस्थिती नाजूक असल्याची माहिती 'राॅ'चे पवन शर्मा यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0