दहशतवादी क्रमाक ५७ कासिम गुजर! जाणून घ्या पळकुट्या 'कासिम'चा इतिहास

07 Mar 2024 18:10:07
 KASIM GUJJAR
 
नवी दिल्ली : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचे सदस्य मोहम्मद कासिम गुजरला दहशतवादी घोषित केले आहे. कासिम सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहत आहे. गृह मंत्रालयाने गुरुवारी त्याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले.
 
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आदेश जारी करताना त्याचे नाव शस्त्रास्त्र पुरवठा, दारूगोळा पुरवठा, आयईडी स्फोटांसह अनेक दहशतवादी घटनांमध्ये दिसून आले आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये लपून बसलेला गुजर हा जम्मूच्या रियासी जिह्यातील अंगराला गावचा आहे.
 
हे वाचलंत का? -  'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देणारा 'राहुल गांधीं'चा निकटवर्तीय? गांधींसह काँग्रेस नेत्यांसोबत फोटो व्हायरल
 
भारतातील अनेक दहशतवादी घटना, बॉम्बस्फोट आणि अशा हल्ल्यांमध्ये अनेक कासिम गुजरचा हात आहे. या घटनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या हत्येला गुजर जबाबदार आहे. दहशतवादी कारवायांबाबत गृह मंत्रालयाने सांगितले की, मोहम्मद कासिम अनेक नवीन दहशतवादी मॉड्यूलमध्ये सामील आहे. याशिवाय, त्याने सोशल मीडिया आणि ऑनलाइन एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन ॲप्लिकेशन्सद्वारे लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले.
 
बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा १९६७ च्या कलम (ए) च्या उपकलम (१) ३५ अंतर्गत गृह मंत्रालयाने मोहम्मद कासिमला दहशतवादी घोषित केले आहे. देशाची एकता आणि अखंडतेच्या विरोधात कोणीही कारवायांमध्ये गुंतलेले आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृह मंत्रालयाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. दहशतवाद विरोधी कायदा यूएपीए कायद्या अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित होणारा कासिम गुजर हा ५७ वा व्यक्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कासिम गुजरचे वय ३२ आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0