आयटीआय उत्तीर्ण असाल तर 'ट्रेडसमन ट्रेनी' म्हणून अर्ज करा, प्रशिक्षणानंतर मिळेल २२ ते ८८ हजार रुपये वेतन!

06 Mar 2024 13:24:23
ITI Tradesmen Trainee Recruitment
 

मुंबई :  'इंडियन रेअर अर्थ लिमिटेड'ने नवीन पदभरतीकरिता अधिसूचना प्रसिध्द केली आहे. या अधिसूचनेनुसार 'इंडियन रेअर अर्थ लिमिटेड'अंतर्गत आयटीआय उत्तीर्णाना काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तर तरुणांनो नोकरी करायची आहे तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या पदभरतीकरिता दि. २३ फेब्रुवारी २०२४ पासून अर्ज स्वीकृतीस सुरुवात झाली आहे, आजच अर्ज करा. 'इंडियन रेअर अर्थ लिमिटेड'मधील रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. 'इंडियन रेअर अर्थ लिमिटेड'मधील 'हयुमन ६७ रिक्त जागांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. या पदभरतीसंदर्भा आवश्यक निकषांबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.

 
हे वाचलंत का? >>>  बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ३ हजार जागांकरिता आजच अर्ज करा, 'या' उमेदवारांना
प्राधान्य!
 
 
पदाचे नाव -

ट्रेडसमन ट्रेनी (६७ जागा)
 

शैक्षणिक पात्रता -
 
आयटीआय, दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.


नोकरीचे ठिकाण -

केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, भोपाळ, ओडिशा.


वयोमर्यादा -
 
३५ वर्षे
(एससी, एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट.)
(ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३ वर्षांची सूट.)
 
 
स्टायपेंड -

२० हजार रुपये.
प्रशिक्षणानंतर २२ हजार ते ८८ हजार रुपये वेतन मिळेल.
 

अर्ज शुल्क -

५०० रुपये.

 
सदर भरतीकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १५ मार्च २०२४ असेल.


Powered By Sangraha 9.0