कार्ड ग्राहकांसाठी मोठी बातमी: आरबीआयने कार्ड कंपन्यांना फटकारत ' हे ' नवे आदेश दिले !

06 Mar 2024 12:35:27

Card Network
 
 
 
 
 
 
 
मुंबई: आरबीआयने बुधवारी ग्राहकांच्या बाजूने मोठा कौल दिला आहे. क्रेडिटकार्ड जारिकर्त्या कंपन्यांना ग्राहकांवर दुसऱ्या कंपनीचे कार्ड वापरून नये यासाठी कंपन्यांच्या निर्बंधांना आरबीआयने फटकारले आहे. क्रेडिटकार्ड विकत घेतल्यानंतर काही कंपन्या करार करत दुसऱ्या कंपन्यांची कार्ड वापरण्यास ग्राहकांना मज्जाव करतात.अखेरीस यात आरबीआयने लक्ष देत कार्ड कंपन्यांना वापरकर्त्यांबरोबर अशा प्रकारचा करार यापुढे करण्यास प्रतिबंध केला आहे.
 
आरबीआयने आपल्या निरिक्षणात असे प्रकार निदर्शनात आल्याचे म्हटले आहे. आरबीआयच्या माहितीनुसार,कार्ड नेटवर्क,कार्ड इश्यूअर(जारिकर्त्या) कंपन्या अशा प्रकारचे करार करत ग्राहकांना दुसरी निवड करण्यासाठी प्रतिबंधित करत आहेत असे आपल्या प्रसिद्धीपत्रात सांगितले. याखेरीज आरबीआयने व्यवहारांच्या नोंदणीत आपल्या निवडीचे स्वातंत्र्य दिले पाहिजे याचा उल्लेख करत कार्ड कंपन्यांना ताकीद दिली आहे.
 
भारतामध्ये अमेरिकन एक्सप्रेस, डायनर्स क्लब इंटरनॅशनल, मास्टरकार्ड, व्हिसा आणि रुपेचे नेटवर्क भारतातील ग्राहकांना सेवा पुरवतात, परंतु प्रदाता सामान्यतः जारी केलेल्या कार्डच्या आधारावर बँकेद्वारे पूर्वनिश्चित केला जातो. त्यामुळेच कंपन्यांना या नव्या आरबीआयच्या सुचनांचे पालन करण्यासाठी आरबीआयने आदेश केले आहेत.अस्तिवात असलेल्या ग्राहकांना सेवेचे नुतनीकरण करताना या पर्यायाचा लाभ घेता येईल.
 
खाजगी बँक ग्राहकांना आपल्या कार्ड खरेदी व कार्ड नूतनीकरणदरम्यान आपापल्या बँकांना यासंबंधी पत्र व्यवहार करावा लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0