छत्रपतींनी हाती 'मशाल' धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल : संजय राऊत

05 Mar 2024 13:38:14
Shahu Maharaj

मुंबई :
कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराजांनी लोकसभा निवडणूक आमच्या पक्षाकडून लढवावी, त्यासाठी महाराजांनी मशाल चिन्हावर लढावं, असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोल्हापूरची जागा याआधी शिवसेनेची होती त्यामुळे आम्हाला असं वाटतं की, शाहू महाराजांनी आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, असेही राऊत यावेळी म्हणाले. तसेच, छत्रपती यांनी हातात मशाल धरली तर आम्हाला आनंद आहे महाराष्ट्र उजळून निघेल, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, दरम्यान, या उमेदवारीबाबत आम्हाला शाहू महाराज यांच्या बरोबर चर्चा करून त्यांना विचाराव लागेल. विनंती करावी लागेल की, ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार आहेत का?, संजय राऊत म्हणाले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीकरिता शाहू महाराजांना कोल्हापूर येथून तिकीट देण्यास शिवसेना(ठाकरे गट) आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे.

काँग्रेस व शिवसेना(ठाकरे गट) उमेदवारीबाबत रस्सीखेच?

कोल्हापूरातून श्रीमंत शाहू महाराजांना लोकसभा निवडणूक उमेदवारीचे तिकीट देण्यासाठी मविआत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधताना म्हटले की, शाहू महाराजांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी. राऊतांच्या या विधानामुळे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाकडून थेट उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, काँग्रेस पक्षाकडूनही शाहू महाराजांना उमेदवारीचे ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या उमेदवारीबाबत मोठे भाष्य केले आहे. पटोले म्हणाले, शाहू महाराजांनी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढायचं हे त्यांनी ठरवावं, असे वक्तव्य नाना पटोले म्हणाले आहेत.


Powered By Sangraha 9.0