शाहू महाराजांनी निवडणूक लढवू नये : हसन मुश्रीफ

05 Mar 2024 14:07:34
Hasan Mushrif

मुंबई : 
कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवावी याकरिता मविआतील घटक पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादी नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराजांच्या उमेदवारीबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. "शाहू महाराजांनी निवडणूक लढवू नये. तसेच, मी त्यांना विनंती करतो की, आपण आदर्श आहात. त्यामुळे कोल्हापूरातील जनतेची अशी विनंती आहे की, तुम्ही निवडणूक लढवू नका, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मविआचे नेते संजय राऊत यांनी शाहू महाराजांनी 'मशाली'वर निवडणूक लढवावी असे विधान करत उमेदवारीबाबत उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले. या विधानावर आता हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली असून शाहू महाराज आमचे आदर्श त्यांनी लोकसभा निवडणूक लढवू नका. तसेच, उमेदवारीबाबत म्हणाल तर मविआचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, आम्हाला असं वाटतं की, शाहू महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवू नये.


काँग्रेस व शिवसेना(ठाकरे गट) उमेदवारीबाबत रस्सीखेच?

 
कोल्हापूरातून श्रीमंत शाहू महाराजांना लोकसभा निवडणूक उमेदवारीचे तिकीट देण्यासाठी मविआत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधताना म्हटले की, शाहू महाराजांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी. राऊतांच्या या विधानामुळे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाकडून थेट उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, काँग्रेस पक्षाकडूनही शाहू महाराजांना उमेदवारीचे ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या उमेदवारीबाबत मोठे भाष्य केले आहे. पटोले म्हणाले, शाहू महाराजांनी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढायचं हे त्यांनी ठरवावं, असे वक्तव्य नाना पटोले म्हणाले आहेत.

कोल्हापूरातून श्रीमंत शाहू महाराजांना लोकसभा निवडणूक उमेदवारीचे तिकीट देण्यासाठी मविआत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने शाहू महाराजांना राज्यसभा उमेदवारीबाबत विचारणा केली होती. त्यानंतर आता लोकसभेकरिता जिल्ह्यातून उमेदवारी देण्याची तयारी मविआ घटकपक्षांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नाना पटोले व संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस व शिवसेना(ठाकरे गट) यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

Powered By Sangraha 9.0