सोन्याचांदीचे भाव वाढले !

05 Mar 2024 18:45:03

Gold Silver
 
 
मुंबई: आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याज दर कपातीच्या संभाव्यतेने सोने बाजारात उसळी मारत सोन्याचे नवे उच्चांक प्रस्थापित केला आहे. सराफबाजारात आज सोन्याच्या दरात भरघोस वाढ झालेली आहे. मार्चमध्ये सुरूवातीलाच २२ कॅरेट व २४ कॅरेट मूल्यात दरवाढ झाली आहे.
 
 
जूनमध्ये फेडरल रिझर्व्ह दर कपातीच्या भाकितामुळे तीन महिन्यांतील उच्चतम वाढ सोन्यात झाली आहे. दिल्लीतील सोन्याच्या भावात १० ग्रॅम सोन्याची किंमत ६५००० रूपये झळकली असून मुंबईतील सोन्याच्या सराफ बाजारात २४ कॅरेट प्रकारच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ६४८५० रूपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आली आहे.
 
 
चांदीच्या किंमतीही वधारल्या असून चांदीची प्रतिकिलो किंमत ७४९०० रुपये झाली आहे. कालच्या सत्रात चांदीचे भाव प्रति किलो ७४००० रूपयांपर्यंत पोहोचले होते. याविषयी बोलताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, सोन्यातील भाववाढ ही अमेरिकन बाजारातील औद्योगिक व बांधकाम क्षेत्रातील घट झाल्यामुळे ठरली. याशिवाय सोने हे बाय ऑन डीप मालमत्ता ठरली आहे.'
 
 
दरम्यान, भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत ७६० रुपयांच्या वाढीनंतर ६४,८५०/१० ग्रॅम आहे आणि १०० ग्रॅम पिवळ्या धातूची किंमत ७,६०० रुपयांनी वाढल्यानंतर ६,४८,५०० रुपये आहे.
 
Powered By Sangraha 9.0