ठाणे (दीपक शेलार) : गेले काही दिवस उकाड्याने त्रस्त असलेल्या ठाणेकराना गार वाऱ्यामुळे दिलासा मिळाला आहे. सोमवारी, पारा किमान २१ अंशावर घसरल्याने ठाण्यात थंडीची हुडहुडी वाढली आहे. ढगाळ वातावरण आणि थंड हवेच्या प्रवाहामुळे नागरिक हिवाळयाची अनुभूती घेत आहेत.
ठाणे शहरात वाढत्या नागरीकरणाबरोबरच अनेक प्राकृतिक बदल होत असले तरी विपुल वनराईदेखील पसरली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहचला होता. त्यानंतर, १ मार्च रोजी पडलेल्या अवकाळी पावसानंतर,पुन्हा थंड हवेचा मोसम सुरु झाल्याने ठाणेकर गारवा अनुभवत आहेत.
पाऊस अनियमित पडल्याने वातावरणातदेखील झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील नोंदीनुसार सोमवारी किमान तापमान २१ अंश सेल्सियस तर,कमाल तापमान ३१ अंशावर होता. पाऊस अनियमित पडल्याने वातावरणातदेखील झपाट्याने बदल होऊ लागले आहेत.
ठाण्यात गारवा ...
हिमालयीन परिसरासह उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेच्या झंझावातामुळे मुंबईसह राज्याच्या किनारपट्टीवर बाष्पयुक्त थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे दिवसभर आकाश अंशतः ढगाळ असल्याने तापमानात घट झाली आहे. आणखी दोन दिवस हा गारवा राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत.
तापमान तक्ता (अंश सेल्सियसमध्ये)
1 मार्च. 2024 – किमान 26.09 कमाल 37.02
2 मार्च. 2024 – किमान 24.01 कमाल 32.08
3 मार्च 2024 – किमान 24.06 कमाल 30.04
4 मार्च. 2024 – किमान 21.02 कमाल 31.04